Share

दिशा पाटनीने ब्रा शिवाय परिधान केला ‘असा’ ड्रेस, फोटो पाहून चाहत्यांचे हार्ट झाले क्लीन बोल्ड

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आपल्या बोल्ड स्टाईलने दररोज एकापेक्षा एक वरचढ ठरते. आता पुन्हा एकदा दिशा पटानीने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दिशाचा हा फोटो काही मिनिटांतच व्हायरल झाला असून अल्पावधीतच त्यावर लाखो लाईक्स आले आहेत. हा फोटो समोर येताच नेटिझन्स दिशाच्या धाडसी स्टाईलबद्दल बरीच चर्चा करत आहेत.(Disha Patani, looks, dressing sense, fitness, Tiger Shroff)

ताज्या फोटोंमध्ये, अभिनेत्री मेहरून कलरच्या ऑफ शोल्डर फिटेड गाऊनमध्ये ब्रालेस स्टाईलमध्ये दिसत आहे. तिने हा लूक अतिशय सिझलिंग स्टाईलमध्ये कॅरी केला आहे. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने चमकदार हलका मेकअप केला आहे आणि तिने आपले केस खुले ठेवले आहेत. यासोबत तिने कानात छोटे झुमके घातले आहेत. या अवतारात अभिनेत्री नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे.

दिशा पटानी जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा चाहते तिला पाहतच राहतात. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या लुक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. अशा परिस्थितीत, वापरकर्ते नेहमीच तिच्या नवीन लूकची आतुरतेने वाट पाहत असतात.

दिशा पटानीने नुकतेच आणखी एक हॉट फोटोशूट केले आहे. यामध्ये ती ब्लॅक ब्रालेस आणि पँट घालून हॉट पोज देताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही व्हायरल झाला आहे. दिशा पटानी सध्या टायगर श्रॉफला डेट करत आहे. अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही. मात्र ते अनेक प्रसंगी एकत्र दिसत आहेत.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. लवकरच ती ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीचा तोच लूक आणि स्टाइल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. याशिवाय दिशा दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनच्या ‘प्रोजेक्ट के’मध्येही दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
एवढ्या थंडीत दिशा पटानीने समुद्राच्या पाण्यात क्लिक केला फोटो, नेटकरी म्हणाला, कोणतं च्यवनप्राश खातेस
PHOTO: मर्यादेपेक्षा बोल्ड ड्रेस घालून ट्रेलर लॉन्चला पोहोचली दिशा, फिगर पाहून चाहते झाले थक्क
VIDEO: जबरदस्त ऍक्शन स्टंट करताना दिसली दिशा, व्हिडीओ पाहून लोकांनी काढली टायगरची आठवण
जॉन अब्राहमचा तेहरान देणार शाहरूखच्या पठाणला टक्कर, फर्स्ट लुक झाला रिलीज, पहा फोटो

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now