Share

Disha and tiger: दिशा पाटनी आणि टायगरचे ६ वर्षांचे नाते संपुष्टात, जवळच्या मित्रानेच दिली धक्कादायक माहिती

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेलं कपल म्हणून दिशा पटानी (disha patni) आणि टायगर श्रॉफ (tiger shroff) यांना ओळखलं जात होत. ते गेल्या ६ वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाबद्दलची चर्चासुद्धा सुरू होती. त्यांनी अनेकवेळा सोबत वेळ घालवला. डिनर, पार्टीमध्ये एअरपोर्टवर सुद्धा ते सोबत आढळले पण त्यांनी कधी नात्याची कबुली दिली नाही.

सद्यस्थितीमध्ये त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त समोर येत आहे. ६ वर्ष जुने नाते इतक्या सहज का तुटले याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. नाते संपुष्टात आले असूनही त्यांची मैत्री कायम आहे. त्यांनी एकमेकांना चित्रपटासाठी शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहे. दिशा सध्या ‘एक विलन रिटर्न’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या प्रतिक्षेत आहे, तर टायगरने सोमवारी त्याच्या येणाऱ्या ‘स्क्रू ढिला’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

आता ते सोबत काम करणार नाहीत अशी माहितीदेखील पुढे आली आहे. ब्रेकअपचा टायगर श्रॉफवर कोणताही परिणाम झालेला नाही. तो लंडनमध्ये त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘बागी२’ चित्रपटाचे मुख्य कलाकार दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांचे सोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झालेले होते.

याच फोटो आणि व्हिडीओ वरून ते रिलेशनशिपमध्ये असल्याची सर्वत्र चर्चा होती. मालदीव व्हेकेशनच्या फोटोची चर्चासुद्धा भरपूर प्रमाणात झालेली होती. इतके चर्चेत असताना त्यांच्या ब्रेकअपची धक्कादायक बाब समोर आली. टायगरच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या सुरूवातीलाच ते वेगळे झाल्याचे समजते.

त्यांच्या बाबतीत अजून कोणतीही माहिती स्पष्टपणे मिळलेली नाही. या दोघांच्या वेगळे होण्याने चाहत्यांना धक्का बसलेला आहे. त्यांच्यात गेल्या एक वर्षापासून भांडणं होत असल्याची माहिती मित्राने दिली आहे. दोघे वेगळे होऊनदेखील अजूनही मित्र आहेत, परंतु त्यांच्या ब्रेकअपचे कारण अजूनही समोर आलेले नाहीत.

टायगर आणि दिशा यांनी ब्रेकअपच्या बातमीवर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहत्यांना विश्वासच बसत नाहीये की दिशा आणि टायगर आता सोबत नाहीत. पण याबाबत अधिकृत अशी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या
Kabaddi: चालु सामन्यात खेळाडूचा झाला मृत्यू; भारतातील भयानक घटनेने क्रिडाविश्व हादरले
रोहीत शर्मा म्हणतो ‘हा’ आहे २१ शतकातील सर्वात रिकामटेकडा भारतीय क्रिकेटपटू
भारत फायनलमध्ये जाईल पण ‘या’ संघाकडून पराभूत होईल; टी-२० वर्ल्डकपबाबत पाँटिंगची भविष्यवाणी
IND Vs WI: सुपरफ्लॉप ठरल्यामुळे कर्णधार शिखर धवनने ‘या’ खेळाडूची केली संघातून हकालपट्टी

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now