Share

मुलगाच झाला आईचा वैरी! पत्नीच्या ‘या’ हट्टापाई जन्मदात्या आईला ढकललं नदीत, पोलिसही झाले निशब्द

Crime

कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात पत्नीच्या हटापाई आपल्या 60 वर्षीय आईला नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माणूसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वांनाच सुन्न करुन टाकले आहे. कर्नाटकातील 38 वर्षीय युवकाने आपल्या मित्राच्या मदतीने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

याबाबतचे वृत्त टाईम्स ग्रुपने दिले असून त्यांच्या माहितीनुसार, संबंधीत घटनेतील आरोपीचे नाव भीमाशंकर यलीमेली असे आहे. भीमाशंकर यांच्या पत्नीला 60 वर्षीय रचम्मा शराबन्ना यालीमेली आई घरात नको होती. सासूच्या रोजच्या कटकटीला कंटाळ्यामुळे भीमाशंकर यांच्या पत्नीने आईला कुठे तरी सोडून या असा हट्ट पतीकडे केला होता.

त्यामुळे पत्नीच्या या रोजच्या हट्टाला कंटाळून भीमाशंकर यांनी खरच आईला सोडण्याचा निर्णय घेतला. भीमाशंकर यांची आई गेल्या कित्येक दिवसापासून आजारी होत्या. त्यामुळे त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याच्या बहान्याने भीमाशंकर यांनी आईला गाडीवर बसविले. यानंतर भीमाशंकर यांनी आपल्या आईला शहापूर तालुक्यातील हुरसागुंडगी इथे नेऊन भीमा नदीत फेकून दिले.

आपल्या आईला नदीत फेकताना एकदाही भीमाशंकर यांना लाज वाटली नाही. किंवा आपल्या जन्मदात्या आईविषयी त्यांना थोडी दया वाटली नाही. हे घाणेरडे कृत्य भीमाशंकर यांनी आपल्या मित्राच्या मदतीने केले. मित्रानेही काही न म्हणता आईला पाण्यात फेकण्यास मदत केली. या घटनेचे काही दिवस उलटून जाताच भीमा नदीत एका बाईचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

यानंतर पोलिसांच्या तपासातून भीमाशंकर यांचे घाणेरडे कृत्य उघडकीस आले. या प्रकरणी आता पोलिसांनी भीमाशंकर, त्याची पत्नी आणि मित्रावर कारवाई केली आहे. एका मुलानेच आपल्या आईला नदीत फेकून दिल्याचे समोर आल्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या
VIDEO: रात्री दारु पिऊन डान्स केला, सकाळी पोलिसांनी चांगलीच उतरवली; विद्यार्थ्यांनी थेट माफीच मागितली
“होय, जातीपातीच्या राजकारणाला शरद पवारच जबाबदार”, जनतेचा राज ठाकरेंच्या वक्तव्याला पाठिंबा
प्रसिद्ध जोडप्याच्या ब्रेकअपनं बॉलिवूड हादरलं, तीन वर्षानंतर नातं संपल्यामुळे चाहतेही झाले दु:खी
भाजप-मनसे युती पक्की? देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now