अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये अनेक घटस्फोट झाले आहेत. अनेक जोडप्यांचे नाते तुटले, घरे विखुरली. आता या यादीत सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि पत्नी सीमा खान यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. सोहेल खान आणि सीमा खान यांचा 24 वर्षांनंतर घटस्फोट होणार आहे.(disagreement-between-sohail-khan-and-seema-khan-for-6-years-salman-khan)
काही वर्षांपूर्वी सलमान आणि सोहेलचा भाऊ अरबाज खानने(Arbaaz Khan) पत्नी मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतला होता. खान कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. सलमानने हे नाते वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही.
सीमा खान(Seema Khan) अनेक वर्षांपासून पती सोहेल खानपासून वेगळी राहत होती. सीमा खानने सांगितले होते की ती आणि सोहेल एकत्र राहत नाहीत. तिचा सोहेलशी झालेला विवाह पारंपारिक विवाह नाही. पण तो एक कुटुंब आणि चांगला पिता आहे. भाऊ सोहेलचे विवाहित नाते वाचवण्यासाठी सलमानने खूप प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान सोहेलच्या घरीही त्याची समजूत घालण्यासाठी गेला होता. बराच वेळ दोघांमध्ये चर्चा झाली.
2016 मध्ये सोहेल खान(Sohail Khan) आणि सीमा खानचे लग्न वाचवण्यासाठी सलमान खानने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु आता ज्या प्रकारे दोघांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, त्यावरून तो प्रयत्न फसला असल्याचे दिसून येत आहे.
त्यानंतर एका सूत्राने सांगितले होते की, सलमान भाऊ अरबाजचे लग्न वाचवू शकला नाही, पण तो सोहेल खान आणि सीमा यांचे नाते वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सलमानसाठी(Salman Khan) कुटुंबापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. तो त्यांच्या खूप जवळ आहे. पण सलमानचे प्रयत्न फळाला आले नाहीत.
सोहेल खान आणि सीमा खान यांच्या वैवाहिक जीवनात काही वर्षांपूर्वी अडचणी येऊ लागल्या, जेव्हा या अभिनेत्याचे नाव हुमा कुरेशीसोबत जोडले गेले. त्या वेळी सीमा खानही घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. सेलिब्रिटी क्रिकेट लीगदरम्यान हुमा कुरेशीची(Huma Qureshi) सोहेल खानशी भेट झाली होती.
हुमाला सोहेलच्या क्रिकेट टीम मुंबई हीरोजची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आली होती. हुमा कुरेशी आणि सोहेल खानला पाहताच सर्वत्र चर्चा रंगू लागल्या. हळूहळू ही गोष्ट सीमा खानच्या कानावरही गेली. त्या वेळी हुमा कुरेशी ज्या इमारतीत सोहेल खान राहतो त्याच इमारतीत शिफ्ट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
सोहेलसोबतच्या अफेअरच्या बातम्यांना हुमा कुरेशीने खोटं म्हटलं होतं. त्याचवेळी सीमा खाननेही या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की अशा अफवा कोठून येत आहेत हे माहित नाही. ती घराबाहेर पडली नाही, तर मुलगा आणि सासूसोबत पनवेलच्या फार्महाऊसवर होती.
सीमा खान आणि सोहेल खान यांच्या घटस्फोटामागील कारण काहीही असले तरी सीमा सोहेलला चांगला पिता मानते. याविषयी सीमाने सांगितले की, ‘आमचे कुटुंब अमेजिंग आहे. सोहेल एक अमेजिंग पिता आहे. तो मुलांच्या जन्मापासून नेहमीच माझ्यासोबत होता. मी त्याच्यावर प्रेम करते आणि नेहमीच करेन. आमचे नाते खूप चांगले आहे. फरक एवढाच आहे की तुम्ही मोठे झाल्यावर तुमची नाती वेगवेगळ्या दिशेने जातात.