विनोदाचं उत्तम टाइमिंग आणि आपल्या जबरदस्त हटके विनोदी शैलीने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर कुशल बद्रिके याचा आज वाढदिवस आहे. कुशल बद्रिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचा खास मित्र विजू मानेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. (Director Viju Mane’s public post on Kushal Badrike)
विजू माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, ‘तू ठार वेडा आहेस. तू कधीतरी हळवा होतो. जरा जास्तच हळवा होतो. तुझ्या आसपास असल्याने वातावरणात चैतन्य दरवळत असतं. माझ्या प्रत्येक कलाकृतीत तुझा खारीचा वाटा आहे.’
विजू माने पुढे म्हणतो की, ‘खारीचा नव्हे यारीचा वाटा आहे. तुला खूप सुदृढ, संपन्न आणि स्ट्रगलर सालाच्या शूटिंगच्या दिवसासारखं आयुष्य लाभो. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा’, अशा शब्दात विजू मानेने कुशल बद्रिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
विजू माने दिग्दर्शित कुशल बद्रिकेची ‘स्ट्रगलर साला’ ही वेब सिरीज खूप गाजली. त्यात कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण या मंडळींनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. तरुणांची आजकालची भाषा, बोलण्यातला चावटपणा, शिव्या या गोष्टींचा वापर वेबसिरिजमध्ये पाहायला मिळतो. तरुणांचा प्रचंड प्रतिसाद या सिरीजला मिळत असल्याने स्ट्रगलर सालाचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
कुशल बद्रिके आणि विजू माने यांच्या मैत्रीचे किस्से खूप गाजले आहेत. कुशल बद्रिके आणि विजू माने यांची मागच्या काही काळात एक पोस्ट खूप गाजली होती. ज्यामध्ये ते दोघे एका हॉटेलमध्ये लिंबू सरबत पितात आणि त्याचे बिल भलेमोठे येते. तेव्हा लिंबू सरबत पेक्षा बियर स्वस्त आहे, असं कॅप्शन देत त्यांनी फोटो शेअर केला होता.
कुशल बद्रिके ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांना खळखळून हसवत आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका देखील साकारल्या. कुशल बद्रिके या आपल्या मित्राला ‘तू फार वेडा आहेस आणि तितका हळवा आहे’ अशा सुंदर शब्दात विजू मानेने शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या पोस्टची सध्या सोशल मीडिया चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच; ठाकरे समर्थक कल्याण शहरप्रमुखावर जीवघेणा हल्ला
एकनाथ शिंदे गटातील 37 बंडखोर आमदारांचा पराभव होणार; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
एकनाथ शिंदेंचा शिवसेनेवर अखेरचा घाव; थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली ‘ही’ मागणी