ऑन ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी एमआयएमचे नेते घोसेऊद्दीन मोहम्मद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या कामात अडथळा आणल्यामुळे तसेच त्यांना धमकी दिल्यामुळे मोहम्मद यांना अटक झाली आहे. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत घोसेऊद्दीन मोहम्मद ऑन ड्युटीवर असणाऱ्या मुशीराबाद पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना थेट धमकी देताना दिसत आहेत. रमझानच्या महिन्यात माझ्या विभागात येऊ नका असे पोलीस कर्मचाऱ्यांना मोहम्मद यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी पोलिसांचा उल्लेख ‘सौ रुपये का आदमी’ असा केला आहे.
https://twitter.com/AskAnshul/status/1511398035468685312?t=9YnGA4oVcAlHr6InZB28VA&s=19
मोहम्मद यांनी पोलिसांना बोलताना, ‘हे माझ्या परिसरात चालणार नाही. या विभागात महिनाभर यायचं नाही हे तुम्हाला सांगितलं होतं. मग तुम्ही इथे कशासाठी आलात? तुमचं काम करा आणि निघा. तुमच्या वरिष्ठ निरीक्षकांना फोन करा. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यांना सांगा नगरसेवक इथेच आहे,’ अशी आरेरावी भाषा वापरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा पर्यंत दुकाने चालू असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हे पोलिस कर्मचारी मोहम्मद यांच्या विभागात गेले होते. परंतु दुकानदारांवर कारवाई करेपर्यंतच त्याठिकाणी मोहम्मद दाखल झाले. यावेळी त्यांनी पोलिसांना आपले काम करु दिले नाही.
तसेच त्यांना थेट धमकी देत परत जाण्यास सांगितले. यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहम्मद यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मोहम्मद यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वीही पोलिसांच्या कामात अडथळा आणल्यामुळे राजकिय नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु तरी देखील असे प्रकार थांबणे बंद झालेले नाही.
महत्वाच्या बातम्या
“सौ रुपये का आदमी! पुन्हा माझ्या विभागात आला तर..”, एमआयएमच्या नेत्याची थेट पोलिसांना धमकी
१२ तारखेला १२ वाजता बारामतीत काय घडणार? संतप्त कर्मचाऱ्यांनी सांगितला प्लॅन, सरकारच्या अडचणी वाढणार
‘पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न’ एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून संजय राऊत संतापले
“खोटे स्टॅम्प पेपर छापून अन् रेशनचे तांदूळ ढापून करोडो मिळत असेल तर पोलिसांकडून खंडणी कशाला घेईल?”