बॉलिवूडचा(Bollywood) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. पण यादरम्यान दिशा पटानीला स्टेजवर बोलावताच तिचा लूक पाहून सगळ्यांनाच तिच्या किलर लूकचे आणि सुंदर सौंदर्याचे वेड लागले.(direction-reached-the-trailer-launch-wearing-a-bold-dress-beyond-the-limits)
या खास प्रसंगी दिशा पटानी(Disha Patani) ब्लॅक कलरचा रिवीलिंग ड्रेस परिधान करून पोहोचली की लोक तिला बघतच राहिले. यावेळी दिशाने काळ्या रंगाच्या लॉग स्कर्टसह त्याच रंगाचा ब्रॅलेट परिधान केला होता.
दिशा पटानीचा हा ड्रेस इतका खुलून दिसत होता की, अभिनेत्री स्टेजवर येताच लोकांच्या नजरा तिच्या कंबरेवर खिळल्या. दिशाचा हा ड्रेस इतका टाईट होता की तिला चालणेही कठीण होत होते. स्टेजवर अभिनेत्री हाई हील आणि घट्ट कपड्यांमध्ये चालताना दिसली.
या अपकमिंग चित्रपटाचा ट्रेलर(Trailer) रिलीज झाला आहे. यामध्ये दिशा पटानी जॉन अब्राहमसोबत अनेक इंटिमेट सीन्स आणि बोल्ड सीन्स देताना दिसली. तर दिशा व्यतिरिक्त आणखी एक अभिनेत्री तारा सुतारिया या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत लिपलॉक करताना दिसली होती.
एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट 29 जुलैला प्रदर्शित होणार आहे. 2014 मध्ये एक व्हिलन नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा(Siddharth Malhotra), श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख होते.
चित्रपटात सिद्धार्थ नायक होता आणि रितेशने विलनची भूमिका केली होती. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. त्यामुळेच आता या चित्रपटाचा सिक्वेल नव्या स्टोरीसह प्रदर्शित होत आहे.