Share

मोदीजी, एवढय़ा दिवस तुम्ही कुठे होता? युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यीनींचा मोदींना सवाल

narendra-modi.j

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादात कित्येक भारतीय तेथील भागात अडकून बसले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम सुरू केली आहे. परंतु या मोहिमेला उशीर झाल्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे.

अशीच टीका युक्रेनमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थिनीने देखील केली आहे. युक्रेन सीमेजवळ अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीने वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी तीने आपली सध्याची स्थिती सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी संताप व्यक्त केला. विद्यार्थिनीने वृत्तवाहिनीला दिलेली हीच मुलाखत सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

या व्हिडीओमध्ये विद्यार्थिनी म्हणत आहे की, मोदीजी, आज इथे कोणी अमेरिकन नागरिक का अडकून पडलेले नाहीत? बायडेन यांना जे कळलं ते तुम्हाला कसं नाही कळलं? आम्ही सतत तुम्हाला ईमेल करत होतो. व्हिडीओत विद्यार्थिनी चांगलीच संतप्त झालेली पाहिला मिळत आहे.

याचबरोबर विद्यार्थिनीने दूतावासाकडून मिळणाऱ्या मदतीसंदर्भात मोदींना प्रश्न विचारला आहे. दूतावासाकडून काही वेळापूर्वीच आलेल्या सूचनांत बॉर्डरवरून बाहेर काढलं जाईल असं म्हटलंय. परंतु मी एक विचारू इच्छिते की, आज एवढे हिंदुस्थानी येथे अडकले आहेत. मोदीजी, एवढ्या दिवस तुम्ही कुठे होता? असा थेट सवाल तीने मोदींना विचारला आहे.

तसेच, एक महिना तुम्ही उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये व्यस्त होता. तुम्ही नक्की कुठे होता? आम्ही बॉर्डरवर आलोय, पुढे काय? तुम्ही म्हणालात बॉर्डरवर या. आम्ही बॉर्डरवर आलोय. आता पुढे काय? इथे दोन लोक आहेत. दोन लोक 20 हजार जणांना बाहेर काढणार का? अशा संतप्त शब्दात युक्रेन सीमेवर अडकलेल्या विद्यार्थिनीने मोदींना सुनावले आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील मोदींवर जोरदार टीका केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये अडकलेले नागरीक मदतीची आशा व्यक्त करत आहेत. लोकांजवळील अन्न आणि इतर गरजेच्या वस्तू संपायला लागल्या आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. यासगळ्यातून बाहेर काढण्याची मागणी नागरिक करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या
गोड बातमी! शिवतीर्थावर लवकरच हलणार पाळणा, राज ठाकरे होणार आजोबा
रतन टाटांनी पैसे लावलेल्या कंपनीचा आयपीओ लवकरच येणार; तुफान कमाईची ही संधी सोडू नका
मुलांनी म्हातारपणात सोडलं वाऱ्यावर, मग म्हाताऱ्यानेही इंगा दाखवत 3 कोटींची संपत्ती केली दान
‘मी त्याला फोन लावला आणि त्याने मला एकटीला भेटायला बोलावलं’, अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ

आंतरराष्ट्रीय राजकारण

Join WhatsApp

Join Now