राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या पियुष गोयल, अनिल भोंडे आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि शिवसेनेचे संजय राऊत विजयी झाले आहेत. राज्यसभेची सहाव्या जागेची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आहे. (dipali sayyad criticize devendra fadanvis)
या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची ९ मते फुटली आहेत. त्याचा फायदा भाजपला झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे.
आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. “राज्यसभेची निवडणूक जिंकल्यामुळे मुख्यमंत्री बनता येत नाही”, असा खोचक टोला दीपाली सय्यद यांनी ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
या ट्विटमध्ये शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी लिहिले आहे की, “एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही, एका राज्यसभेने मुबंईचे महापौर बनता येत नाही, एका राज्यसभेने कोल्हापुर पोटनिवडणुक जिंकतां येत नाही. १०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही.”
एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही,एका राज्यसभेने मुबंईचे महापौर बनता येत नाही,एका राज्यसभेने कोल्हापुर पोटनिवडणुक जिंकतां येत नाही.१०६काय१३०असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही.काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 11, 2022
राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने घोडेबाजार करून ही निवडणूक जिंकली आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी आरोप करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही आमदारांची नावे घेतली आहेत.
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांना ४१.५६ मतं मिळाली आहेत. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. ज्यसभा निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले आहेत. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
वेश्यांचा आदर करा, देहविक्री व्यवसायाला कायदेशीर मान्यता आणि सन्मान द्या; अमृता फडणवीसांची मागणी
मुलींना ‘या’ योजने अंतर्गत मिळणार मोफत स्कूटी, जाणून घ्या काय आहे योजना आणि त्यासाठीच्या पात्रता
‘आधी उद्धव साहेबांना विचारा मग आरोप करा’, घोडेबाजाराचा आरोप केल्यानंतर संजयमामा राऊतांवर संतापले