एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. नंतर त्यांनी भाजपसोबत मिळून सरकारही स्थापन केले. त्यानंतर आता रोजच शिवसेना आणि शिंदे गटातील नेते यांच्यात एकमेकांवर टीकास्र सोडणे सुरु आहे. त्यांच्यातील हे टीकास्र आता वैयक्तिक पातळीवरही येताना दिसत आहे. यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. यात त्यांनी केसरकरांच्या नातवासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं ते विसरू नये? असे वक्तव्य केले होते.
आता आमदार दीपक केसरकर यांनी किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आमचे नेते असल्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही काहीही बोलणार नाही. परंतु, माझ्याविषयी जे मुद्दे उपस्थित केले जातील, त्याचे उत्तर मी नक्कीच देईल. माझ्या नातवाच्या इंटरनॅशनल स्कुलमधील ऍडमिशनबाबत मी उद्धव ठाकरेंशी बोललो होतो. मात्र, माझ्या नातवाला तिथे ऍडमिशन मिळाली नाही.
आता तुम्ही जर एवढ्या छोट्याछोट्या गोष्टी मीडियासमोर आणणार असाल तर मीसुद्धा तुमच्यासाठी काहीतरी केले आहे. ती गोष्ट यापेक्षाही अधिक महत्वाची आहे. तुमच्यावरील आदरापोटी मी काही गोष्टी जनतेसमोर आणलेल्या नाहीत. मात्र, येत्या दोन दिवसात मी निश्चितच त्या जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
आदित्य ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघात जाणार असल्याचे जाहीर केले, तर त्यांनी अवश्य जावे. मुख्यमंत्रांचे ऑपरेशन झाले, तेव्हा मुख्यमंत्र्याचा चार्ज दिला गेला नाही, असे देशात पहिल्यांदा झाले. एकनाथ शिंदे किंवा सुभाष देसाई यांना प्रभारी मुख्यमंत्रीपद देता आलं असतं, परंतु एवढाही विश्वास त्यावेळी तुम्ही दाखवला नाही. एकनाथ शिंदेंवर विश्वास न ठेवताच त्यांना विश्वासघातकी बोलणे योग्य नाही, असेदेखील ते यावेळी बोलले.
ज्यावेळी आम्ही हजारो लोकांची अशी पर्सनल कामे करत असतो, तेव्हा ते आम्ही असे बाहेर बोलून दाखवत नाहीत. या अशा छोट्याछोट्या गोष्टी बाहेर बोलून दाखवायच्या नसतात. आम्ही तुमचा आदर करतो त्याचा स्वीकार करा. अन्यथा, लोकशाहीने आम्हालादेखील तेवढाच अधिकार दिलेला आहे. आम्ही तुमच्या आदरापोटी काही बोलत नव्हतो, परंतु तुम्ही आता ती वेळ आमच्यावर आणली आहे. त्यामुळे आम्हालादेखील आता बोलावे लागणार, असे केसरकर उद्धव ठाकरेंना बोलले.
महत्वाच्या बातम्या
बाळासाहेबांनी दिलेला पहिला उमेदवार शिंदे गटात; बीड जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार
राज ठाकरेंना आव्हान देणारा बृजभूषण सिंह मुंबईत येणार? मनसे कसं स्वागत करणार?
शेवटच्या श्वासापर्यंत नेतृत्त्वाची साथ सोडणार नाही; कार्यकर्त्याने राज ठाकरेंना दिलं ‘शपथपत्र’
….तर आम्ही एकनाथ शिंदेंनाही सोडणार होतो; शहाजीबापूंचा खळबळजनक गौप्यस्फोट