Dipak kesarkar | आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट नारायण राणेंनी आखला आहे असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुंद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, याच्याविरोधात मी भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारही केली आहे.
आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जात आहे आणि वस्तुस्थितीमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशांत सिंह राजपुत प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणेंचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे जे लोक प्रेम करतात ते या कारणामुळे दुखावले गेले होते.
भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी माझे जवळचे संबंध आहेत त्यामुळं मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्हीच कसा वापरू देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे.
त्यानंतर केसरकर म्हणाले की, मला कोणीही सांगितलं नव्हतं तरी मी स्वताच्या संपर्कानं पंतप्रधानांशी संपर्क केला आणि त्यानंतर त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याला व्यवस्थित प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचा संपर्क सुरू झाला.
त्यानंतर त्यांची भेटही झाली होती. त्यावेळी मला पंतप्रधानांबाबत हे कळालं की कुटुंबप्रमुख कसा असावा? त्यांच्यामध्ये ठाकरे कुटुंबियांप्रती असलेले प्रेम प्रतित होत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते की, मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्यात मी जास्त महत्व देतो.
त्याचवेळी ते आपल्या पदाचा त्याग करणार होते. त्यानंतर ते मुंबईत आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार होते. ही गोष्ट फक्त उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि मलाच माहिती होती. पण मधल्या काळात भाजपच्या १२ लोकांचं निलंबन झालं होतं.
त्यावेळी भाजपकडून निरोप आला होता की, आपली बोलणी सुरू आहे आणि असं निलंबण योग्य नाही. यादरम्यान, नारायण राणेंची केंद्रिय मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांची बोलणी थांबली, असा खुलासा केसरकरांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Election: आमदाराला त्याच्याच साध्या कार्यकर्त्याने धोबीपछाड देत जिंकली निवडणूक; केला सुपडा साफ
Mahesh Babu: आधी म्हणाला बॉलिवूडला मी परवडणार नाही, आता करतोय पदार्पन, साऊथ सुपरस्टार ट्रोल
Eknath Shinde: बंडानंतरही औरंगाबादमध्ये शिंदे गटाचा दणदणीत विजय; शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दारूण पराभव
Ujjwal nikam: सुप्रीम कोर्टातील घडामोडींनी एकनाथ शिंदे टेंशनमध्ये? मध्यरात्री घेतली उज्ज्वल निकमांची भेट