भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले आणि विशाखापट्टणम आणि राजकोटमध्ये विजयांची नोंद केली. शुक्रवारी झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्यासह दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) कठीण परिस्थितीत अडकलेल्या संघाला बाहेर काढले. सामना संपल्यानंतर त्याने संघाबाहेर राहण्याचे दुःख काय असते हे सांगितले.(Dinesh Karthik, South Africa, Hardik Pandya, Team India)
कार्तिक म्हणाला, मला विश्वचषक खेळायचा आहे या गोष्टीसाठी मी खूप वचनबद्ध होतो. हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण मी येथे बराच काळ होतो. तसेच मला हे चांगलेच माहित आहे की बाहेर असताना कसे वाटते. भारतासाठी खेळणे किती महत्त्वाचे आहे हेही मला चांगले माहीत आहे.
म्हणूनच मला काहीतरी खास करायचं होतं आणि सुदैवाने RCB ने मला ते व्यासपीठ दिलं, जी भूमिका मला सर्वात जास्त आवडते. मी त्यासाठी सराव केला, खूप मेहनत घेतली आणि ते करायचं ठरवलं. अर्थातच प्रेम आणि कर्णधारापासून प्रशिक्षकापर्यंत, ज्यांनी मला इथपर्यंत येताना पाहिले आहे अशा सर्वांकडून मला स्नेह मिळाल आहे, विशेषत: निवडकर्त्यांनी पुढे येऊन मला ही संधी दिली आहे.
कार्तिक पुढे म्हणाला, आता मी या टप्प्यावर आहे की, मला तो खेळाडू व्हायचे आहे जो संघ कठीण परिस्थितीतून जात असताना संघाला विजय मिळवून देईल. काहीतरी नवीन आणि खास करायचं आहे. कारण मी बाहेर बसून अशी परिस्थिती अनेकवेळा पाहिली आहे. मला चांगले माहित आहे की टीमचा भाग बनणे किती कठीण आहे.
कार्तिक पुढे म्हणाला मला असे वाटते की, मला अनेकदा वगळण्यात आले आहे आणि मला नेहमीच भारतीय संघात परतायचे होते. पंतच्या खराब फॉर्मशिवाय विशाखापट्टणममधील दुसऱ्या सामन्यात भारताने त्यांच्या चुकांवर मात करत मोठा विजय नोंदवला. आता या पाच सामन्यांच्या मालिकेत टिकून राहण्यासाठी त्यांना आणखी एका विजयाची गरज आहे जेणेकरून पाचव्या सामन्यात मालिकेचा निर्णय होईल.
महत्वाच्या बातम्या-
त्यामुळं दिनेश कार्तिकच्या आधी अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवलं, श्रेयस अय्यरनं सांगितलं कारण
हार्दिक पांड्याने घेतला भावाच्या अपमानाचा बदला दिनेश कार्तिककडून? 3 वर्ष जुनी घटना झाली ताजी
दिनेश कार्तिकसोबत हार्दिक पांड्याने निभावली मैत्री, स्वता कार्तिकने केले कौतुक, म्हणाला
तर राहुल द्रविड आणि रोहित शर्माने राजीनामा द्यावा, दिनेश कार्तिकसाठी चाहते मैदानात