JOGI trailer: पहिल्यांदाच पगडीशिवाय दिसला दिलजीत, दिल्ली शीख दंगलीच्या जखमा झाल्या ताज्या

दिलजीत दोसांझ, हितेन तेजवानी, अमायरा दस्तूर, कुमुद मिश्रा आणि जीशान अय्युब स्टारर ‘जोगी’चा ट्रेलर (JOGI trailer) मंगळवारी रिलीज झाला. हा चित्रपट 1984 च्या शीखविरोधी दंगलीची कथा सांगणार आहे. 16 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा 2 मिनिटे 12 सेकंदांचा दमदार ट्रेलर (JOGI trailer) प्रेक्षकांच्या मनाला हेलावून टाकतो.

‘जोगी’चे दिग्दर्शन ‘गुंडे’, ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर 31 ऑक्टोबर 1984 च्या सकाळी म्हणजेच दंगलग्रस्त सकाळपासून सुरू होतो. सुरुवातीला दिलजीतच्या घरात हशा आणि आनंदाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे.

मात्र, संध्याकाळपर्यंत केवळ या कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण शहराची आणि देशाची परिस्थिती बदलते. दिलजीत ऑफिसला निघाला असतो, अचानक गोळ्यांचा आवाज येतो आणि जाळपोळ सुरू होते. काही वेळातच शहरभर दंगली उसळल्या. यानंतर दंगलखोर बसमध्ये दिलजीत आणि त्याच्या कुटुंबियांना मारायला सुरुवात करतात.

दिलजीत त्यांना विचारतो, ‘आमची चूक काय’? तर दंगेखोर म्हणतात, ‘तुम्ही सरदार आहात ना हाच तुमचा दोष आहे.’ त्यानंतर लवकरच संपूर्ण शहरातील परिस्थिती बिघडते. चित्रपटाची कथा दिलजीतचे कुटुंब आणि त्याच्या इतर दोन मित्रांभोवती विणली गेली आहे. यामध्ये ते 3 दिवस दंगलीत कसे टिकून राहतात हे दाखवण्यात आले आहे.

नेटफ्लिक्सनेही हा चित्रपट आपल्या ‘फिल्म डे’ निमित्त सादर केला आहे. या चित्रपटात अभिनेता दिलजीत दोसांझसोबत अभिनेत्री अमायरा दस्तूर दिसणार आहे. ट्रेलरच्या एका सीनमध्ये दाखवण्यात आले आहे की, दंगलीमुळे दिलजीत आपले केस कापतो आणि हे पाहून त्याची आई ढसाढसा रडते. या ट्रेलरमध्ये 1984 च्या दंगलीची भीषणता आणि ते वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आले आहे. एक हसतमुख शीख कुटुंब या दंगलीत बळी पडल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

हा चित्रपट दिलजीतच्या करिअरमधील 8 वा हिंदी चित्रपट आहे. दिलजीतने 2016 मध्ये ‘उडता पंजाब’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने ‘फिल्लौरी’, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’, ‘सूरमा’, ‘अर्जुन पटियाला’, ‘गुड न्यूज’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Shah Rukh Khan: प्रेक्षकांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकल्यावर बॉलिवूडला आली अक्कल, दिग्दर्शक म्हणाला, जास्त गर्व…
Amit Shah : अमित शहांच्या आरोपाने बॉलिवूडमध्ये खळबळ; म्हणाले, काही निर्माते, दिग्दर्शक पोलिसांची…
Bollywood : बॉलीवूडवर शोककळा! सनम बेवफा, सौतनसारखे हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन