Share

‘पावनखिंड’चा थरार पाहायला व्हा तयार; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकवेळा चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. तर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली असून १८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

लॉकडाऊननंतर १० जून २०२१ ला पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, राज्यात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या नव्या व्हेरिंयटमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे पुन्हा चित्रपटाचे पुन्हा पुढे ढकलत २१ जानेवारी ही प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आली.

त्यानंतर कोरोनाच्या अपरिहार्य परिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत असल्याचे निर्मात्यांद्वारे सांगण्यात आले. तर आता शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रेक्षकांना पावनखिंडीचा थरार सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.

दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. दिग्पाल यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटाचा एक पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत लिहिले की, ‘स्वराज्य रक्षणासाठी रचलेल्या रणसंग्रामाचं अग्निकुंड आपल्या भगव्या रक्ताने धगधगतं ठेवणाऱ्या मराठ्यांच्या स्वामीनिष्ठेची, त्यागाची आणि पराक्रमाची गौरवगाथा म्हणजे पावनखिंड… १८ फेब्रुवारी २०२२ रोजी फक्त चित्रपटगृहात’.

हा चित्रपट म्हणजे दिग्पाल यांनी संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील तिसरं पुष्प आहे. यापूर्वी दिग्पाल यांच्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिखस्त’ या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. तर आता पावनखिंड या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी पावनखिंडीत दिलेल्या लढ्याचा थरार चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आल्मंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

आमिरच्या भाच्याने सर्वांसमोर केला होता चुही चावलाला प्रपोज; जुहीने दिले ‘असे’ खणखणीत उत्तर 

अजय देवगनच्या मुलीचा ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून चाहते हैराण; पहा व्हायरल फोटो

सलमानवर सतत टीका करणाऱ्या अभिनेत्याचे सपशेल लोटांगन; म्हणाला तो माझा शत्रू नाही, तो तर..

 

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now