Share

Digpal lanjekar: ‘मी नकळत मोहनजींच्या पाया पडलो’, पावनखिंडच्या दिग्दर्शकाने सांगितला रेशीमबागेतील अनुभव

digpal lanjekar mohan bhagwat

Digpal lanjekar meet mohan bhagwat | दिग्पाल लांजेकर हे प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबतच उत्कृष्ट लेखकसुद्धा आहेत. ‘सख्या रे’, ‘तू माझा सांगाती’, या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘कोडमंत्र’ नाटकाचे काही प्रयोगसुद्धा त्यांनी केले आहे. दिग्पाल लांजेकर त्यांच्या आगामी ‘गरुडझेप’ या सिनेमाचं काम लवकरच सुरू करणार आहेत.

‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या सिनेमामध्ये सुद्धा त्यांना यश आले आहे. दिग्पाल यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती म्हणजे दिग्पाल यांनी संघाच्या रेशीमबागेला भेट दिली आहे. रेशीमबागेतील काही क्षण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

दिग्पाल पोस्ट मध्ये लिहतात की, “शिवराज अष्टकाच्या माध्यमातून समाजाचा अनेकांगी आशीर्वाद आणि प्रेम सातत्याने लाभते आहे. पण माणसाच्या आयुष्यात काही क्षण हे सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखे असतात आणि माझ्या आयुष्यात मला हे क्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने बऱ्याचदा अनुभवता आले आहेत आणि येत आहेत. ‘रेशीमबाग’ या ठिकाणी जाण्याचं… ती वास्तू अनुभवण्याचं…

तिथे वास्तव्य करण्याचं प्रत्येक स्वयंसेवकाचं स्वप्न असतं… आणि या सगळ्यात तुम्हाला संघाच्या कुटुंबप्रमुखांचा म्हणजेच सरसंघचालकांचा सहवास लाभणार असेल तर? बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या मला आणि माझा बंधू निखिलला हीच पर्वणी मिळाली 25 आणि 26 जुलैला”.

दिग्पाल पुढे लिहतात की,”पावनखिंडचं प्रदर्शन राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक भाषिक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रचारकांसह सरसंघचालकांसाठी रेशीमबागेत करण्यात आलं. ही कलाकृती पाहताना भाषा, प्रांत सगळे भेद सरले. काहीजणांना भाषा कळत नव्हती. पण भावना सगळ्यांना भिडत होती.”

शेवटी बाजीप्रभू आणि बांदल वीरांच्या त्यागाने बलिदानाने भावविभोर झालेल्या त्या देशभक्त कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मा. मोहनजींनी दुसऱ्या दिवशी न्याहारीला भेटण्याचा निरोप दिला आणि भारावलेल्या मनानं आम्ही रेशिमबाग सोडली.”

मोहन भागवत यांनी दिग्पालला प्रश्न विचारला. नफा तोटा कसा सांभाळता? मोहनजींच्या प्रश्नाला उत्तर देत दिग्पाल म्हणाला की, “नफा तोट्याचा आम्ही विचार करत नाही. पण शिवभक्तांसमोर प्रामाणिक शिवप्रेरणा मांडायचा प्रयत्न करतो. आम्ही खूप प्रामाणिक काम करत असल्याचं पटल्यामुळे शिवभक्त आम्हाला बुडू देत नाहीत. अख्खी शिवशक्ती हा शिव पराक्रमाचा सोहळा संपूर्ण जगात साजरी करते.”

https://www.facebook.com/digpal.lanjekar/posts/pfbid0AWPg22BTKHqznVp84MUuszuomABqNL3mxZryz4XszqEn5L6p2rLn5sXqMjxJE97Tl

सर्व आटोपल्यांनंतर मोहनजींनी काय प्रतिक्रिया दिली?
मोहनजींकडे पाहिलं… ते हसत एक पाऊल पुढे आले. मी नकळत पाया पडलो… मला म्हणाले “या कलाकृतींमधून वंदनीय शिवचरीत्र साकारून तुम्ही राष्ट्रीय कार्य करत आहात… हे कार्य असंच अव्याहत चालू ठेवा…” सहजपणे पाठीवर एक शाबसकी देऊन खूप रात्र झाली असली तरी मोहनजी पुढच्या बैठकीला निघून गेले…

महत्वाच्या बातम्या
संजय राऊतांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर; करणार ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन
Accident: पिकअपमध्ये डीजे लावणे पडले महागात; वीजप्रवाह पसरून १० जण ठार, तर १६ जण गंभीर जखमी
Urfi Javed VIDEO: नुसती तार गुंडाळून उर्फी जावेदने केल्या सर्व मर्यादा पार, बोल्डनेस पाहून लोकांचाही सुटला संयम; असे झापले की…
“संजय राऊत यांच्या नंतर आता शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता देखील जाणार तुरुंगात”

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now