Share

जगावर येतय आजवरच सर्वात मोठं संकट; लोकं थंडीने गारठणार, मशीन्सही पडणार बंद, सर्वात मोठा धोका तर…

Petrol

diesel crices in the world impact on machines  |  जागतिक अर्थव्यवस्थेत अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे डिझेल. रेल्वे इंजिन, जहाजे, ट्रक अशी अनेक वाहने तसेच अनेक मोठ्या मशीन्स त्यावरच चालतात. त्यामुळे डिझेल खूप महत्त्वाचे इंधन आहे.

अशात एक धक्का देणारी गोष्टी समोर आली आहे. जगभरात डिझेलचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. त्याचा संपूर्ण जगावर वाईट परिणाम होणार असून होणाऱ्या विकासाची गतीही मंदावण्याची शक्यता आहे.

डिझेलची मागणी सतत वाढत आहे. अशात जर डिझेलचा तुटवडा निर्माण झाला तर डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा संपूर्ण जगावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने लोकांचे जगणे कठीण होऊ शकते. फक्त अमेरिकेत डिझेलच्या किमती जर वाढल्या तर अर्थव्यवस्थेला १०० अब्ज डॉलर्सचा फटका बसू शकतो. अमेरिकेतील डिझेलचा साठा चार दशकांतील सर्वात कमी पातळीवर आहे.

तसेच रशियाकडून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने युरोपची स्थिती बिघडत चालली आहे. जागतिक निर्यात बाजारातील परिस्थिती इतकी जुळलेली आहे की पाकिस्तानसारख्या देशांचा पुरवठा थेट थांबवण्यात आला आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिझेल संकट असल्याचे म्हटले जात आहे.

यूएस स्पॉट मार्केटमध्ये डिझेलच्या किमतीत यावर्षी ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्याची किंमत ४.९० डॉलर प्रति गॅलनवर पोहोचली, ती गेल्या वर्षापेक्षा दुप्पट असल्याचे दिसून येते. युरोपमधील डिझेल फ्युचर्सची किंमत ब्रेंटपेक्षा ४० डॉलर प्रति बॅरल जास्त आहे.

काही ठिकाणी वीज निर्मितीसाठीही याचा वापरत केला जातो. तर युरोप आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी घर उबदार ठेवण्यासाठी डिझेलचा वापर करतात. अशात डिझेलचा तुडवडा पडला तर संपूर्ण जगासाठी हे मोठं संकट असेल.

महत्वाच्या बातम्या-
जगावर येतय आजवरच सर्वात मोठं संकट; लोकं थंडीने गारठणार, मशीन्सही पडणार बंद, सर्वात मोठा धोका तर…
भाजप-शिंदे सरकार कोसळणार, पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी; केंद्रातील नेत्यांनाही लागलीय भनक

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now