Share

crime news : मावा खाताना घडलं विपरीत; क्षणात गेला जीव, प्रसंग वाचून उडेल थरकाप

crime news

crime news : माणसाच जीवन म्हणजे घडीच घडयाळ असं म्हणतात..! हे सांगण्याच कारण म्हणजे व्यक्तीला क्षणात काहीही होऊ शकतं. असं म्हणलं जातं की, जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, हे अगदी खरं..! अशीच एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे.

या घटनेने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुलंगा खुर्द गावात ही धक्कादायक घटना घडलिया आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मावा खाल्ल्यावर ठसका लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.

वाचा नेमकं काय घडलंय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पातूर तालुक्यात तुलंगा खुर्द गावातील आहे. सचिन अविनाश आठवले (३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खूप दिवसांपासून सचिन यांना मावा खाण्याचे व्यसन होते. अन् अखेर माव्यानेच सचिन यांचा जीव घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन यांनी सुपारी आणि तंबाखूमिश्रित मावा खाल्ल्याने त्यांना जोरात ठसका लागला आणि बघता – बघता ते जमिनीवर कोसळले. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना श्वास घेणे कठीण झाले होते. सचिनची ही अवस्थता पाहून नागरिकांनी तात्काळ सचिनला वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

दरम्यान, तपासणी करून डॉक्टरांनी सचिन यांना मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. मावामधील सुपारी अन्ननलिकेत फसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी सांगितला आहे.

चान्नी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, अशा अनेक दुर्घटना अलीकडे घडताना पाहायला मिळत आहे. तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे मृत्यूचे देखील प्रमाण अलीकडे वाढलेले पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी 
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!
इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now