गायक केके याचे निधन झाले आणि संगीत क्षेत्राने मोठा तारा गमावला. केकेच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. प्राथमिक अहवालानुसार, केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असे सांगण्यात आले होते. मात्र आता केकेच्या मृत्यूबाबत कोलकाता पोलिसांनी नवी माहिती दिली आहे.
३१मे रोजी गायक केके चं निधन झालं. त्यानंतर प्राथमिक तपासात समोर आले की, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र, आता कोलकता पोलिसांनी या संदर्भात नवीन खुलासा केला आहे. पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारावर माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केकेच्या हृदयाच्या वरच्या भागाच्या आसपासचे स्नायू हृदयाच्या इतर भागांपेक्षा जास्त पिवळे होते. हे पोस्टमॉर्टम मधून रिपोर्ट मिळाले आहेत. आता पोलिसांनी दिलेल्या या माहितीमुळे चाहत्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे. सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅक्रोस्कोपिक तपासणीच्या आधारे असं सांगण्यात आलंय की, सिंगर केकेचा मृत्यू तीव्र कार्डिओजेनिक पल्मोनरी एडेमानंतर हायपोक्सियामुळे झाला. ही समस्या subarachnoid रक्तस्राव संबंधित आहे. सबआर्कनॉइड हेमरेज हा एक प्रकारचा स्ट्रोक आहे, ज्यामुळे मेंदूमध्ये आणि आजूबाजूला रक्तस्त्राव होऊ शकतो.
पोलिसांनी सांगितले कीमेडिकल रिपोर्टच्या अहवालानुसार, केकेच्या सब-पेरीकार्डियल फॅटमध्ये वाढ झाल्याचं आढळून आले. इंटरव्हेंट्रिक्युलर धमनीच्या जवळ पिवळसर-पांढरे डाग आढळले. त्यामुळे शरीराचे आतील भाग आकुंचन पावले होते. त्याच्या डाव्या बाजूला कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेज आढळून आले, तर लहान रक्तवाहिन्यांमध्ये लहान ब्लॉकेज आढळले.
मात्र, यावेळी पोलीसांनी अंतिम निष्कर्षावर न पोहोचता, एफएसएल आणि पॅथॉलॉजी विभागाकडून अहवाल आल्यानंतरच अंतिम योग्य ती माहिती समजेल असे स्पष्ट केले आहे. केके चालू शो दरम्यान, तब्येत बिघडल्याने जमिनीवर पडला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं समजलं.