Share

बॉल ऑफ द सेंच्युरी: शेन वॉर्नचा तो चेंडू ज्याने पूर्ण जग झाले होते हैराण, पहा तो ऐतिहासिक क्षण

शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचे दिग्गद क्रिकेटपटू शेन वॉर्नचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण जगभरातून हळबळ व्यक्त करण्यात येत आहे. शेन जॉर्न जगातील सुप्रसिध्द फिरकी गोलंदाजांपैकी एक होते. त्यांच्या गोलंदाजीने सर्वांनाच वेड लावले होते. त्यांच्या बॉलसोबत खेळणे कोणालाच सोप्पे जात नव्हते.

शेन वॉर्नककडे एक असा बॉल होता ज्याला लोक बॉल ऑफ द सेंच्युरी म्हणत असे. आज आपण याच बॉलविषयी जाणून घेणार आहोत. शेन वॉर्नने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत उत्कृष्ट अशी गोलंदबाजी खेळली होती. परंतु शेन वॉर्नकडे एक असा बॉल होता जो कोणाला टाकता येत नव्हता.

https://twitter.com/englandcricket/status/1003592223810904064?s=20&t=GbCyml0d1CFjfrrbeFYJtw

या बॉलसोबत फक्त तेच खेळू शकत होते. 1993 मध्ये एशेज सीरीजमध्ये त्यांनी आपल्या बॉलची कमाल दाखवत इंग्लंडच्या खेळाडूला पहिल्या डावातच आऊट केले होते. त्याच्या या गोलंदबाजीला पाहून सर्वांनाच आश्र्चर्याचा धक्का बसला होता. यांनतर त्यांच्या गोलंदबाजीची चर्चा सर्वत्र होऊ लागली.

सांगण्यात येते की, 3 जून 1993 रोजी वॉर्नने ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर त्यांच्या पहिल्या ऍशेस कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर गॅटिंगला गोलंदाजी केली होती. त्यांनी लेग-स्टंपच्या बाहेर बॉल वाइडमध्ये मारल्यानंतर या बॉलने एक टर्न घेतला आणि त्यांचा ऑफ-स्टंप उडवून गॅटिंगला आश्चर्याचा धक्का दिला.

वॉर्नने आपल्या कारकिर्दीत 145 टेस्ट मॅचमध्ये 708 विकेट केल्या. इतकेच नव्हे तर, त्यांनी 194 वनडे मॅचमध्ये 293 विकेट आपल्या नावी केल्या होत्या. वॉर्न एक विना शतक करता सगळ्यात जास्त रन करणारे खेळाडू होते. वॉर्न यांनी टेस्ट विकेटमध्ये 12 अर्धशतके केले होते. परंतु त्यांचा सर्वोत्तम स्कोर 99 धावांवरच थांबला.

शेन वॉर्न अगोदर सुध्दा अनेक फिरकी गोलंदाज होऊन गेले. तरी देखील वॉर्न यांची एक वेगळी ओळख होती. त्यांना एक जादुई फिरकी गोलंदाज म्हणून ओळखण्यात येत. आता त्यांच्या जाण्याने क्रिकेटविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या
नागराज मंजुळेंमुळे बदललं ‘या’ २० वर्षीय मुलांचं आयुष्य, आभार मानत म्हणाला, कधी विचार केला नव्हता की..
शेन वॉर्नची स्वप्नात देखील धुलाई करायचा सचिन तेंडुलकर, शेन वॉर्नने स्वतःच सांगितला होता ‘तो’ किस्सा
कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या ऊसतोडणी मजुरांच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
शेन वॉर्नच्या निधनामुळे बॉलिवूडलाही बसला जबर धक्का, अनेक सेलेब्रिटींनी व्यक्त केलं दुःख; म्हणाले..

आंतरराष्ट्रीय खेळ

Join WhatsApp

Join Now