नऊ वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र एका घटनेने हादरला ती घटना म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या..! विद्याचे माहेरघर असलेल्या पुण्यात भर दिवसा 20 ऑगस्ट 2013 साली दाभोळकरांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या गोष्टीला आता जवळपास नऊ वर्ष उलटून गेली आहे.
मात्र अद्याप दाभोळकरांचे मारेकरी सापडले नाहीये. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी काही संशयितांना अटक करण्यात आली होती पण त्यांना पुराव्यांच्या अभावी सोडून देण्यात आलं. यामुळे दाभोळकरांचे खूनी नेमके केव्हा सापडणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
त्याचं झालं असं की, पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील शिंदे पुलावरून २० ऑगस्ट २०१३ रोजी मॉर्निंग वॉक करत असताना दोन हल्लेखोरांनी दाभोळकरांना गोळ्या घातल्या. त्या हल्ल्यात दाभोळकरांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुणे शहर पोलिसांकडून २०१४ साली हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं.
मात्र अद्याप या प्रकणतील मारेकरांचा शोध लागलेला नाहीये. याच सर्व प्रकरणावर आता दाभोळकरांच्या कुटुंबीयांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तपास यंत्रणांनी दाभोळकर हत्या प्रकरण गांभीर्याने न घेतल्याचा आरोप दाभोळकरांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
नागपूर येथील कार्यक्रमात बोलताना डॉ. हमीद दाभोळकर आणि मुक्ता दाभोळकर यांनी तपास यंत्रणांबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच हत्या प्रकरण तपास यंत्रणांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे पुढे गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही हत्या झाली अशी खंत हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘प्रशासन आणि तपास यंत्रणांनी तेव्हाच आमचे म्हणणे गांभीर्याने घेतले असते, तर गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या देखील टाळता आल्या असत्या. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर आम्ही पहिल्याच जबाबात संघटित प्रयत्नांनी केलेला खून आहे हे तपास यंत्रणांना सांगितले होते, असं हमीद दाभोलकर यांनी सांगितले.
“यापुढे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत”, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंची उडाली झोप
जेव्हा भारताचे विमान हायजॅक झाले तेव्हा पाकिस्तानने केली मदत, किस्सा वाचून विश्वास बसणार नाही
सायरस मिस्त्रींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणाऱ्या सिमोन टाटा कोण? रतन टाटांशी आहे थेट संबंध
संजय राउतांना बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरेंचे ठेत भाजपसोबत ‘सेटलमेंट’? राजकीय समीकरण बदलणार