माला सिन्हाने खरंच शर्मिला टागोरला कानाखाली मारली होती का? जाणून घ्या खरं सत्य

बॉलीवूडमध्ये आजपर्यंत अशा अनेक कथा आहेत, ज्या याआधी आपण ऐकल्या नाहीत. जेव्हा गोष्ट येते अभिनेत्रींमधील कॅट फाइटची तेव्हा फार कमी लोकांना माहित आहे की ही लढाई खूप जुनी आहे. ही कॅट फाइट चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीपासूनच सुरू आहे, त्यातील काही किस्से तर सर्वश्रुत आहेत, पण काही किस्से असे आहेत, जे ऐकलेही नाहीत. असाच एक किस्सा 54 वर्षांपूर्वीचा आहे, जो त्या काळातील इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री माला सिन्हा (Mala Sinha) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांच्यात घडला होता.(Did Mala Sinha really slap Sharmila Tagore)

हा किस्सा 1968 मध्ये आलेल्या ‘हमसाया’ चित्रपटातील सेटदरम्यानचा आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर असे काही घडले की, माला सिन्हा चिडली आणि तिने शर्मिला टागोरला कानाखाली मारली. हा चित्रपट जॉय मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये माला सिन्हा आणि शर्मिला टागोर मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या आणि जॉय मुखर्जी स्वतः चित्रपटात नायक होते.

Mala Sinha ने Sharmila Tagore को सच में मारा था थप्पड़? जानें 54 साल पहले इस घटना में कितनी है सच्चाई

असे म्हटले जाते की, जेव्हा चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले, त्यावेळी अभिनेत्री माला आणि शर्मिला यांच्यात सर्व काही ठीक होते. दोघांनीही एकत्र शूटिंग केले, पण मग असे काय झाले की त्यांच्यामध्ये सर्वकाही बदलले? बातम्यांनुसार, शर्मिला टागोर आणि माला सिन्हा यांच्यात चित्रपटाच्या संवादांपासून ते गाण्यांपर्यंत आणि अगदी कपड्यांपर्यंत स्पर्धा होती. कोणता संवाद आणि गाणे कोणाला मिळणार यावरून दोघींमध्ये भांडण वाढले.

inner_image_humsaya_film.jpg

दिग्दर्शक आणि नायक जॉय मुखर्जी यांनी नंतर या गोष्टीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली की, दोन्ही अभिनेत्री एकमेकींच्या समोर येणार नाही, परंतु असे होते की दोन्ही अभिनेत्री एकमेकींच्या समोर यायच्या. एके दिवशी माला सिन्हा आणि शर्मिला टागोर यांच्यात या प्रकरणावरून देखील वाद झाल्याचे सांगितले जाते.

mala_sinha_slapped_sharmila_tagore.jpg

त्याचवेळी दोघींमधील हा वाद इतका वाढला की माला सिन्हा यांनी शर्मिला टागोर यांना जोरदार कानाखाली मारली आणि तिथे उभे असलेले सर्वजण त्या दोघींकडे पाहत राहिले. मात्र, काही वर्षांनी एका मुलाखतीदरम्यान माला सिन्हा आणि शर्मिला टागोर या दोघींनाही या भांडणाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.

माला सिन्हा म्हणाली होती की, ती कधीही तिच्या को-स्टार्सला कानाखाली मारणार नाही आणि तिने कधीही असे केले नाही. त्याचवेळी ती पुढे म्हणाले होते की, चित्रपटाला प्रसिद्धी मिळावी म्हणून अशा गोष्टी केल्या गेल्या होत्या. अशाप्रकारे दोघींनीही कधीच त्यांच्यातील भांडणाविषयी बोलले नाही.

महत्वाच्या बातम्या-
हिंदी चित्रपटात काम करून मला माझा वेळ नाही घालवायचा, साऊथ सुपरस्टारने स्पष्टच सांगितले
मला ड्रग्स दिले आणि माझ्यासोबत;, पूजा मिश्राचे शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप
करोडोंची मालकीण असणाऱ्या या अभिनेत्रीचा शेवटचा काळ गेला गरिबीत, मुलानेही वाऱ्यावर सोडले
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या नात्यात का आला दुरावा? अखेर सत्य आले समोर