भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रिय क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या एमएस धोनीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. धोनी आणि साक्षीने ४ जुलै २०१० रोजी डेहराडूनमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाला फक्त धोनीच्या अगदी जवळचे लोक उपस्थित होते.(MS Dhoni, Lovestory, Forest Department Officer, Witness)
धोनीची प्रेमकथा त्याच्यावर बनलेल्या चित्रपटापेक्षा खूपच वेगळी आहे. क्रिकेट जगतात महेंद्रसिंग धोनी आणि साक्षीची जोडी खूप प्रसिद्ध आहे. धोनी आणि त्याची पत्नी साक्षीची लव्हस्टोरी संपूर्ण देशाला माहीत आहे. धोनीच्या बायोपिक बॉलीवूड चित्रपट एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरीमध्ये हे चित्रित करण्यात आले आहे. मात्र, माही-साक्षीची खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
धोनी आणि साक्षी दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. साक्षीचे आजोबा वनविभागाचे अधिकारी होते. धोनीचे वडील रांचीमध्ये असलेल्या भारत सरकारच्या स्टील उत्पादन कारखान्यात काम करायचे, त्यामुळे ते रांचीमध्ये स्थायिक झाले. साक्षीचे वडीलही याच कारखान्यात काम करत होते आणि ते एकमेकांना ओळखत होते.
काही काळानंतर साक्षीचे वडील केनई ग्रुपच्या चहा कंपनीत काम करू लागले. धोनी आणि साक्षी रांची येथील डीएव्ही श्यामली शाळेत शिकत होते. पण नंतर साक्षीचे कुटुंब डेहराडूनला शिफ्ट झाले. त्यानंतर २००७ मध्ये कोलकाता येथे जवळपास १० वर्षांनी दोघे भेटले होते. यादरम्यान टीम इंडिया कोलकात्याच्या ताज बंगालमध्ये थांबली होती. साक्षी तिथे इंटर्नशिप करत होती. जिथे दोघांची भेट झाली.
साक्षीचा मॅनेजर युधाजित दत्ता यांनी त्याची धोनीशी ओळख करून दिली. युधाजित दत्ता हा देखील साक्षीचा चांगला मित्र होता. साक्षीने त्याच वर्षी मुंबईत धोनीच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही हजेरी लावली होती. पहिल्या भेटीनंतर माहीने हॉटेल मॅनेजर दत्ता यांच्याकडे साक्षीचा नंबर मागितला आणि तिला मेसेज केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साक्षीला विश्वास बसत नव्हता की एवढा प्रसिद्ध क्रिकेटर तिला मेसेज करत आहे. पहिल्या भेटीनंतर दोघांनी मार्च २००८ मध्ये डेट करायला सुरुवात केली. काही वर्षे डेट केल्यानंतर धोनी आणि साक्षीने २०१० मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला २०१५ मध्ये एक मुलगी झाली, तिचे नाव जिवा आहे. स्टारकिड्सप्रमाणे जिवा देखील सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.
महत्वाच्या बातम्या-
जंगलात जाऊन वैद्यांना भेटून धोनी घेतोय गुडघ्यांवर उपचार, उपचाराचा खर्च ऐकून धक्का बसेल
पंतने एका झटक्यात मोडला धोनीचा 17 वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड, 120 वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं काही..
धोनी आणि पंतमुळे या खेळाडूचं करिअर झालं उद्ध्वस्त, तरीही न खचता करतोय वकीली
धोनी आणि पंतमुळे या खेळाडूचं करिअर झालं उद्ध्वस्त, तरीही न खचता करतोय वकीली