Share

धोनीच्या CSK मध्ये अचानक झाली ‘या’ धडाकेबाज खेळाडूची एन्ट्री, बाकीच्या संघांमध्ये पसरली दहशत

आयपीएल च्या 15 व्या हंगामाला 26 मार्च 2022 पासून सुरुवात होणार आहे. सर्वच संघांनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. यातच चेन्नई सुपर किंग्स या टीमची अधिक चर्चा होत आहे, कारण आता या टीममध्ये एका घातक ओपनरची एन्ट्री होणार आहे. चेन्नईला डुप्लेसिसच्या बदल्यात तोडीसतोड खेळाडू भेटला आहे.

चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघांपैकी एक आहे. गेल्या हंगामात चेन्नईने आयपीएल ट्रॉफी पटकावली होती. यामध्ये चेन्नईचा ओपनर फॅफ डु प्लेसिसचं मोठं योगदान होतं. यानं बॉलर्सना मागच्या हंगामात धु धु धुतलं होतं. त्याची सर्वत्र चर्चा होत होती.

मात्र, यावेळी फॅफ डु प्लेसिसच्या जागी न्यूझीलंडचा आक्रमक आणि तितकीच वादळी खेळी करणारा खेळाडू येणार आहे. हा वादळी खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून, डेव्हॉन कॉन आहे. त्याचा येत्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्स टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्सने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉन याला 1 कोटींत ताफ्यात घेतलं आणि तो चेन्नई सुपर किंग्स साठी ओपनिंगचा सक्षम पर्याय असल्याचं म्हटलं गेलं. माहितीनुसार, आता डेव्हॉन कॉनवे या मोसमात ऋतुराजसोबत ओपनिंग करणार आहे.

ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या आयपीएल मधील त्याची धडाकेबाज खेळी आठवेल. त्याने आयपीएल 2021 मध्ये 16 सामन्यांमध्ये 636 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश होता. त्याने केलेल्या खेळीची सर्वत्र चर्चा होत होती.

चेन्नई सुपर किंग्स सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि फलंदाज अंबाती रायडू जखमी झाले आहेत, तर मोईन अलीला अद्याप भारतात येण्यासाठी व्हिसा मिळालेला नाही. ऋतुराज गायकवाड मनगटाच्या दुखापतीमुळे संघाबाहेर राहील की काय अशी शक्यता वर्तविण्यात येत होती, पण तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.

एमएस धोनी, शार्दुल ठाकूर, केएम आसिफ, दीपक चहर, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, हरभजन सिंग, एन. जगदीशन, मोनू कुमार, मिशेल सॅटनर, रवींद्र जडेजा, लुंगी नागीदी, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रुतूराज गायकवाड, मुरली विजय, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, पियुष चावला, जोश हेझलवुड, साम करन, राई किशोर ही चेन्नई सुपर किंग्स च्या खेळाडूंची यादी आहे.

खेळ

Join WhatsApp

Join Now