भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने (Mahendra Singh Dhoni) ७ जुलै रोजी त्याचा ४१ वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते त्याला विविध प्रकारे शुभेच्छा देत आहेत. काहीजणांनी त्याचा ४१ फूट उंच कटआउट बनवला आहे, तर काहीजण त्याच्या वाढदिवसाला सरप्राईज देत आहेत. पण जर तुम्ही महेंद्रसिंग धोनीचे खरे चाहते असाल आणि त्याच्याकडून काही शिकायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात या ८ सवयी अवलंबल्या पाहिजेत.
जबाबदारी घेणे:
एमएस धोनी कधीही कोणत्याही जबाबदारीपासून दूर गेला नाही. मग ते भारतीय संघाचा कर्णधार बनणे असो किंवा त्याला भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवणे असो. त्याने नेहमीच जबाबदारी घेतली. यावेळी इंडियन प्रीमियर लीगमध्ये जेव्हा त्याच्या संघाची चांगली कामगिरी होत नव्हती आणि रवींद्र जडेजाने CSK चे कर्णधारपद सोडले तेव्हा त्याने पुन्हा संघाचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला.
हार न मानणे:
महेंद्रसिंग धोनीचा सर्वात मोठा गुण म्हणजे तो कधीही हार मानत नाही. जरी सामना त्याच्या हातातून निघून जात असला तरी तो शेवटच्या चेंडूपर्यंत तो प्रयत्न करत राहतो आणि पाहिल्याप्रमाणे तो नेहमी शेवटच्या चेंडूवर चमत्कार करतो. ही त्याची नेव्हर गिव्ह अप वृत्ती आहे ज्यातून आपण शिकले पाहिजे.
फॅमिली मॅन:
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आपला जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवतो. तो रांची येथील त्याच्या फार्महाऊसवर पत्नी, मुले आणि पालकांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
साधेपणा
महेंद्रसिंग धोनीचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. भारतीय संघात स्थान मिळवण्यापूर्वी त्याला तिकीट कलेक्टर म्हणून काम करावे लागले. पण जेव्हा त्याला प्रसिध्दी मिळाली तेव्हा त्याने त्याला हवी (वरचढ) होऊ दिले नाही, पण आजही तो साधे जीवन जगतो, त्याचे वैशिष्ट्य नुकतेच दिसून आले, जेव्हा धोनी आपल्या गुडघ्यांच्या उपचारासाठी रांची येथील एका डॉक्टरकडे गेला होता.
नेहमी स्वत:वर विश्वास ठेवतो
एका मुलाखतीदरम्यान धोनी म्हणाला होता की, तो नेहमी त्याच्या मनाचे ऐकतो. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला नोकरी करण्यास सांगितले तेव्हा त्याने त्याच्या मनाचे ऐकले आणि त्याच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. त्याला रेल्वेत नोकरीही मिळाली पण त्याने क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न सोडले नाही आणि अखेरीस तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला.
दबाव घेऊ नका
महेंद्रसिंग धोनीची संपूर्ण टीम दडपणाखाली असते आणि धोनी एकदम शांत आणि कुल.असतो आणि त्यांना समजावून सांगतो अशा अनेक प्रसंगी आपण पाहिले आहे. त्याला दडपण कसे हाताळायचे हे चांगले माहीत आहे आणि दबावात चांगली कामगिरी कशी करायची हे त्याला माहीत आहे. त्यामुळे त्याला कॅप्टन कूल म्हटले जाते.
सर्वांचा आदर करणे
एवढी मोठी व्यक्ती असूनही धोनी प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो आणि सर्वांशी नम्रपणे बोलतो. मीडिया इंटरव्ह्यू असो किंवा स्ट्रगलिंग क्रिकेटर, धोनी कधीही समोर येत नाही आणि नेहमी सर्वांशी चांगले बोलतो.
पराभवातून शिकणे
एका मुलाखतीदरम्यान महेंद्रसिंग धोनी म्हणाला होता की, जेव्हा तो सामने हरतो तेव्हा त्याला हरल्याचे वाईट वाटत नाही, परंतु तो काहीतरी शिकतोय याचा आनंद होतो आणि पुढच्या वेळी तो ती पोकळी भरून मैदानात परत येतो.
महत्वाच्या बातम्या-
एमएस धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचे हॉट फोटो व्हायरल; अदा पाहून चाहते घायाळ
धोनी आणि पंतमुळे या खेळाडूचं करिअर झालं उद्ध्वस्त, तरीही न खचता करतोय वकीली
धोनीची भविष्यवाणी ठरली खरी, या खेळाडूला मिळाली विश्वचषकात भारताकडून खेळण्याची संधी
मला धोनीची जागा घ्यायची आहे अन्रि यान परागच्या वक्तव्याने पुन्हा चाहते संतापले