भारतीय क्रिकेट संघातून (Indian cricket team) निवृत्ती घेतल्यानंतरही कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) लोकप्रियता थोडीही कमी झालेली नाही. चाहत्यांना त्याच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असते. तसेच त्याच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहितही असतात, पण आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत जी तुम्हाला कदाचित माहित नसेल.(Mahendra Singh Dhoni, captain, Virat Kohli, practice, Sachin Tendulkar)
होय, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मैदानावर कधी ५०, १०० तर कधी १५० पूर्ण करणारा महेंद्रसिंग धोनी अभ्यासात कसा होता आणि त्याला १०वी-१२वी मध्ये किती नंबर मिळाले. त्याचवेळी, आपल्या धमाकेदार इंग्रजीमुळे नेहमीच चर्चेत राहणारा विराट कोहली या वर्गानंतर शाळेत गेला नाही, असेही सांगण्यात येत आहे.
महेंद्रसिंग धोनीचे शालेय शिक्षण जवाहर विद्या मंदिर स्कूल, डीएव्ही, रांची येथून झाले. अभ्यासात तो सरासरी विद्यार्थी होता. त्याला १०वीत ६६% गुण मिळाले होते, तर १२वीत तो प्रथम श्रेणीतही पोहोचू शकला नाही. १२वी मध्ये त्याला 56% गुण मिळाले होते. एका मुलाखतीदरम्यान त्याने स्वतः याचा खुलासा केला होता.
वास्तविक, १२वीत असताना धोनी क्रिकेट खेळल्यामुळे अनेकदा बाहेर राहायचा आणि अभ्यासात जास्त लक्ष देऊ शकत नव्हता. मात्र, क्रिकेट खेळल्यानंतर तो परीक्षा लिहिण्यासाठी रांचीला यायचा आणि एक-दोन दिवस अभ्यास करून ५० ते ६०% आणायचा. त्याच्या या कामगिरीचे अनेकांकडून कौतुक झाले आहे.
![]()
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे इंग्रजी ऐकून ब्रिटीशही थक्क झाले आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विराट ११वीची परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकला नाही आणि त्याने ११वी नंतर शाळेचे तोंडही पाहिले नाही, कारण त्याची निवड अगदी लहान वयातच क्रिकेटमध्ये झाली होती आणि तो अंडर-१९ वर्ल्ड कप टीमचा भाग होता. अशा परिस्थितीत त्याला अभ्यासात लक्ष घालण्याची संधी मिळाली नाही.

दुसरीकडे, जर आपण क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरबद्दल बोलायचे झाले तर, मैदानावर शतक झळकावणारा तेंडुलकर दहावी पासही करू शकला नाही. पण लहानपणापासूनच ते त्यांच्या बॅटने कधी अर्धशतक तर कधी शतक झळकावायचे आणि क्रिकेटमध्ये त्याने असा पराक्रम केला की त्याची टक्केवारी किंवा त्यांच्या यश किंवा अपयशाने काही फरक पडला नाही.
महत्वाच्या बातम्या-
चाहत्यांना धक्का! महेंद्रसिंग धोनीवर गुन्हा दाखल, या एजन्सीच्या मालकाने केले गंभीर आरोप
रोहित शर्मा की महेंद्रसिंग धोनी? कमाईच्या बाबतीत खरा कॅप्टन कोण? आकडे वाचून डोळे फिरतील
महेंद्रसिंग धोनी नंबर ७ ची जर्सी का घालतो? स्वत:च सांगितली जर्सीमागची इनसाईड स्टोरी
धोनीच्या अशा ८ सवयी ज्या सर्वांनी आत्मसात केल्या पाहिजेत, आयुष्यात होईल मोठा बदल






