Share

ढिचँक पुजाचं नवीन गाणं ‘I Am A Biker’ रिलीज, गाणं पाहून नेटकरी म्हणाले, ‘देवाला तरी घाबर’

आपल्या विचित्र गाण्यांसाठी आणि त्यातील अतरंगी लिरिक्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या ढिचँक पूजाचे नाव तुम्ही ऐकला असालच. पूजा नेहमीच तिच्या गाण्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ढिचँक पूजा तिच्या एका नव्या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. ‘I Am A Biker’ असे तिच्या नव्या गाण्याचे नाव असून या गाण्यामुळे सध्या तिची खिल्ली उडविली जात आहे.

पूजाने तिच्या युट्यूब चॅनलवर आणि इन्स्टाग्रामवर ‘I Am A Biker’ या तिच्या नवीन गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्यात पूजाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. यामध्ये पूजा एका बाइकवर बसली असून तिच्या दोन्ही बाजूलाही बाइकवर मुले बसलेले दिसत आहेत. यादरम्यान पूजा गाणं गाताना दिसत आहे.

पूजाच्या गाण्याचे बोल असे आहेत की, ‘आय अॅम अ बाइकर, जैसे कोई टायगर, मोटे थोडा डायट कर, तू भी मुझे लाईक कर’. पूजाचे हे गाणे समोर येताच त्यावर लोकांच्या कमेंटचा वर्षाव सुरु झाला. अनेकांना तिचे हे गाणे खूपच विनोदी वाटत आहे. त्यामुळे लोक तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत तिची खिल्ली उडवत आहेत.

https://www.instagram.com/tv/CY0mZiEF4jO/?utm_source=ig_web_copy_link

‘I Am A Biker’ हे गाणं पाहून एकाने कमेंट करत लिहिले की, ‘आताच जाऊन माझा बाइक जाळतो’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘हे गाणे ऐकून बाइक चालविणे सोडून देईल. नको करूस असलं काही’. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘तू पहिलं गाणं बनवण्याचं बंद कर’.

दरम्यान, पूजाच्या गाण्यांमध्ये लय, ताल, सूर असे काही नसले तरी तिचे गाणे नेहमीच चर्चेत असतात. या गाण्यांमुळे अनेकदा तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. मात्र, पूजाला याचा काही फरक पडत नाही. ती प्रत्येकवेळी पुन्हा तिचे नवीन गाणे घेऊन येत असते.

महत्त्वाच्या बातम्या : 

VIDEO: गणेश आचार्यचा Oo Aantava गाण्यावरचा डान्स पाहून अल्लू अर्जुन-समंथाला फुटले हसू
भाजपने शिवरायांचा पुतळा हटवल्याने मित्रपक्ष नाराज; पाठींबा काढत थेट राजीनामे दिले

भाजपने शिवरायांचा पुतळा हटवल्याने मित्रपक्ष नाराज; पाठींबा काढत थेट राजीनामे दिले

 

 

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now