Share

धर्मेंद्रचा भाऊ वीरेंद्रचा शुटिंगदरम्यानच झाला होता मृत्यू, आजपर्यंत उलगडले नाही रहस्य

बॉलिवूड स्टार धर्मेंद्रला सगळेच ओळखतात, पण त्याचा भाऊ वीरेंद्र सिंग देओलला फार कमी लोक ओळखतात. याचे एक कारण म्हणजे त्यांना अगदी लहान वयातच जगाचा निरोप घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रमाणेच वीरेंद्र देखील चित्रपटसृष्टीतील होते, एक काळ असा होता जेव्हा त्यांना पंजाबी चित्रपटसृष्टीचे बादशाह म्हटले जायचे. आपल्या करिअरमध्ये वीरेंद्रने 25 चित्रपट केले आणि सर्व सुपरहिट ठरले. तो एक यशस्वी अभिनेता तसेच एक यशस्वी निर्माता-दिग्दर्शक होता. 1988 मध्ये वीरेंद्र सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.(Dharmendra’s brother Virendra died during the shooting)

वास्तविक, वीरेंद्र सिंग देओल आणि धर्मेंद्र चुलत भाऊ होते पण दोघांमध्ये सख्या भावांपेक्षा जास्त प्रेम होते. वीरेंद्रच्या मृत्यूच्या दशकांनंतर, त्याचा मुलगा रणदीपने आता त्याच्या वडिलांवर बायोपिक बनवला आहे, ज्यामध्ये धर्मेंद्र आणि त्याचा मुलगा बॉबी देओल देखील होते. धर्मेंद्र यांच्याप्रमाणेच त्यांचा भाऊ वीरेंद्र सिंग देओल यांचाही चित्रपटसृष्टीत दबदबा होता. पंजाबी चित्रपटसृष्टीतील ते सर्वात मोठे सुपरस्टार होते.

80 च्या दशकात वीरेंद्र सिंग देओलला त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांमध्ये स्पर्धा असायची. पण वीरेंद्र जसजसा यशाच्या शिडीवर चढत गेला तसतसे त्याचे अनेक शत्रूही निर्माण झाले. त्यांनी केवळ पंजाबीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही हात आजमावला आहे. त्यांचे ‘खेल मुकद्दर का’ आणि ‘दो चेहरे’ हे दोन्ही चित्रपट यशस्वी ठरले.

dhar.jpg

वीरेंद्र यांनी 1975 मध्ये भाऊ धर्मेंद्रसोबत करिअरला सुरुवात केली. दोघेही ‘तेरी मेरी एक जिंदड़ी’ या चित्रपटात दिसले होते. एकीकडे बॉलीवूडमध्ये धर्मेंद्रचे नाव होऊ लागले, तर दुसरीकडे वीरेंद्रही सुपरस्टार झाला. असे म्हटले जाते की त्याचे हे यश त्याचा शत्रू बनले होते, अनेक लोक त्यांच्यावर चिडायला लागले होते. 6 डिसेंबर 1988 रोजी वीरेंद्र सिंह ‘जट ते जमीन’ चित्रपटाचे शूटिंग करत होते आणि शूटिंगदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

मात्र, वीरेंद्रची हत्या दहशतवाद्यांनी केल्याचेही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. त्यावेळी पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया शिगेला पोहोचल्या होत्या, गोळीबाराच्या घटना सर्रास घडत होत्या. नकार दिल्यानंतरही वीरेंद्र सिंह शूटवर गेले आणि काही अज्ञात लोकांनी त्यांची हत्या केली. मात्र, सत्य काय आहे हे आजतागायत कळू शकलेले नाही.

धर्मेंद्र आणि वीरेंद्र दिसायला सारखेच होते, त्यामुळेच त्यांना पंजाबी चित्रपटांचे धर्मेंद्र म्हटले जायचे. वीरेंद्र सिंह हे त्यांचा भाऊ धर्मेंद्र यांच्या कुटुंबाशी खूप जवळचे होते. बॉबी देओलसोबतचा त्याचा एक फोटो सतत व्हायरल होत आहे. मृत्यूसमयी वीरेंद्र अवघे 40 वर्षांचे होते.

महत्वाच्या बातम्या-
सुपरहिट!झुंडने चित्रपटगृहात घातलाय धुमाकूळ, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल एवढे कोटी
मृत्यूपूर्वी शेन वॉर्न ज्या बेटावर गेला होता त्याचे रहस्य काय? एकांतवासासाठी लोक जातात या ठिकाणी
करोडोंच्या संपत्तीची मालकिन आहे श्रद्धा कपूर, महिन्याची कमाई एकून तोंडात बोटं घालाल
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now