Amitabh Bachchan, Javed Akhtar, Dharmendra, Zanjeer/ बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेले अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 11 ऑक्टोबर रोजी 80 वर्षांचे झाले. त्यांच्या या खास दिवसानिमित्त सर्व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्याचवेळी, सुप्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी एका मुलाखतीत बिग बींचा पहिला सुपरहिट चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जंजीर’बाबत एक असा खुलासा केला की, बॉलीवूडचे हीमॅन म्हणजेच धर्मेंद्र त्यांच्यावर चिडले आणि त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तसंस्थेशी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, जंजीरसाठी अमिताभ शेवटची निवड होते. हा चित्रपट धर्मेंद्रजींसाठी लिहिला होता, पण नंतर त्यांनी काही कारणास्तव या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. प्रकाश मेहरा आधी फक्त चित्रपट डायरेक्ट करत असले, तरी त्यांचा हा पहिलाच प्रोड्यूस केलेला चित्रपट होता.
त्यांच्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट होती, पण नायक नव्हता. ते या चित्रपटाच्या ऑफर घेऊन इतर अनेक अभिनेत्यांकडे गेले, परंतु सर्वांनी ते करण्यास नकार दिला. जावेद अख्तर पुढे म्हणाले, “सर्वांनी हा चित्रपट का नाकारला हे मला समजले आहे. त्यावेळी राजेश खन्ना यांना देव मानले जायचे, चित्रपटात गाणी खूप महत्त्वाची असायची, पण जंजीरमध्ये रोमँटिक अँगल नव्हता, कॉमेडीही नव्हती.
ते पुढे म्हणाले, या चित्रपटाचा नायक सुरुवातीपासून शेवटपर्यंत गंभीर आणि कठोर होता. असा प्रकार यापूर्वी कधीही पडद्यावर दाखवण्यात आला नव्हता. साहजिकच स्क्रिप्ट वेगळी असल्याने सर्वांनी नकार दिला. जावेद अख्तरच्या या खुलाशानंतर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी ट्विटरची मदत घेतली आणि त्यावर आपले मत मांडले.
धर्मेंद्र यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “जावेद, कैसे हो…दिखावे की इस दुनिया में हकीकतें दबी रह जाती हैं. जीते रहो…दिलों को गुदगुदाना खूब आता है…काश सर चढ़ के बोलने का जादू भी सीख लिया होता…” अशा प्रकारे जावेद अख्तरच्या खुलाशांवर आपली प्रतिक्रिया मांडून धर्मेंद्र आणि जावेद दोघेही चर्चेत आले आहेत. मात्र, अमिताभ बच्चन यांचा जंजीर हा चित्रपट 1973 साली प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला.
महत्वाच्या बातम्या-
कपूर कुटुंबानंतर आता धर्मेंद्रच्या घरीही वाजणार सनई-चौघडे, हेमा मालिनी करणार सुनेचं स्वागत
धर्मेंद्र यांनी आशा पारेखला दिले होते ‘हे’ वचन, पुर्ण करता करता धर्मेंद्रचे शरीर झाले होते निळे
Dharmendra: ‘बायकॉट बॉलीवुड’च्या गोंगाटात धर्मेंद्र यांनी चाहत्यांना केले खास आवाहन; हृदयाला स्पर्श करेल ‘हा’ व्हिडिओ