बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र देओल (Dharmendra Deol) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत असतात. यादरम्यान त्यांनी त्यांच्या लोणावळा येथील फार्महाऊमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये उमललेल्या वेगवेगळ्या फुलांबद्दल माहिती दिली आहे.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते त्यांच्या फार्महाऊसमध्ये रंगीबेरंगी फूल उमलल्याचे सांगत आहेत. व्हिडिओत दिसत आहे की, धर्मेंद्र वेगवेगळ्या फुलांजवळ जात आहेत आणि त्याबाबत सांगत आहेत. तसेच ते फार्महाऊमध्ये खूप काही करत असल्याचेही या व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.
व्हिडिओ शेअर करत धर्मेंद्र यांनी लिहिले की, ‘भर जाते है जिंदगी में रंग कुदरत के…. वक्त नहीं मगर पास किसी के… जिंदगी के लिए’. धर्मेंद्र यांची ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांना खूपच पसंतीस उतरत आहे. अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर भरभरून कमेंट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत.
https://www.instagram.com/p/CaqDyufheR6/
दरम्यान, धर्मेंद्र यांचा लोणावळा येथील हा फार्महाऊस १०० एकरामध्ये पसरलेला आहे. ते त्यांचा अधिकतर वेळ या फार्महाऊसवरच घालवतात. त्यांच्या या आलीशान फार्महाऊसमध्ये एक बंगलासुद्धा आहे. ते इथे ऑरगॅनिक शेती करतात. यासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना धर्मेंद्र यांनी सांगितले होते की, ‘माझा अधिकतर वेळ माझ्या लोणावळा स्थित फार्महाऊसमध्येच जातो. आमचा लक्ष्य ऑरगॅनिक शेती करणे आहे’.
धर्मेंद्र यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच ते ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या तिघांशिवाय जया बच्चन आणि शबाना आझमीसुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.
याशिवाय धर्मेंद्र ‘अपने २’ या चित्रपटातही दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांचे तीन पिढ्या एकत्र दिसणार आहेत. धर्मेंद्र यांच्यासोबत या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल आणि त्यांचा नात करण देओलसुद्धा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
१६ वर्षांपूर्वीची परंपरा सोलापुरकरांनी राखली, नागराजचे असे काही स्वागत केले की तो ही झाला चकित
गंगुबाईच्या भूमिकेसाठी आलिया नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रींना देखील देण्यात आली होती ऑफर
झुंड चित्रपटासाठी पडद्यामागचा हिरो ठरला आमिर खान, बिग बींना काम करण्यासाठी केले राजी






