Share

एकनाथ शिंदे पुन्हा एकदा झाले ‘आनंद दिघें’चे सारथी; बुलेटवरचे फोटो तुफान व्हायरल

eknath shinde

नुकताच शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक याने शिवसेना नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाचे बॅनर सर्वत्र लागलेले दिसत आहेत.

शिवसैनिकांसोबतच अनेक चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित होते.

याशिवाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री आणि शिवसेना आमदार एकनाथ शिंदे या सोहळ्याला हजर होते. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे.

तसेच काल ठाण्यात या चित्रपटाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. ठाण्यातील व्हीव्हियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये हा ग्रँड प्रिमियर सोहळा संपन्न झाला. या प्रिमियरला शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती.

विशेष बाब म्हणजे या चित्रपटामध्ये गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक याच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी बुलेटवरून चित्रपटगृहात एन्ट्री घेतली. सध्या एकनाथ शिंदे यांचे हे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहेत.

दरम्यान, काल १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. आनंदाची बाब म्हणजे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.७५ ते १.९० कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बाळासाहेबांचा मुलगा CM, शिंदे मंत्री, त्यांचा मुलगा खासदार, पण दिघे साहेबांच्या घरात नगरसेवकही नाही
२४ बिअर पिऊन त्याने गर्लफ्रेंडसोबत संबंध ठेवले, नंतर ‘त्या’ रात्री जे घडलं ते भयानक होतं..; वाचून अंगावर काटा येईल
‘उद्धवसाहेब..! तुमच्यात ताकद असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्याचे दात तोडून दाखवा’
उमरानचे वडिल म्हणाले, माझा मुलगा भारतासाठी खेळणार; शामीने सुनावले, ‘थोडं थांबा, नुसता वेग कामाचा नाही..

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now