Share

धर्मवीर चित्रपट वादात; समरेणूच्या दिग्दर्शकाने केले गंभीर आरोप, मराठी सिनेसृष्टीत खळबळ

सध्या अनेक चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. बाॅलिवूड, टाॅलिवूड याच्यासोबतच मराठी चित्रपट देखील बक्कळ कमाई करत आहेत. सध्या चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ होय. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत असताना आता धक्कादायक बातमी समोर येत आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट शिवसेना नेते आणि बाळासाहेबांच्या अगदी निकटचे शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.

अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत ‘समरेणू’ च्या दिग्दर्शकांनी नाराजी व्यक्त केली आहे. समरेणूचे दिग्दर्शक महेश डोंगरे यांनी म्हटले आहे की, धर्मवीर चित्रपटाची टीम पीव्हिआर, वगैरेंना प्रेशराईज करत आहे की, आमचेच सिनेमे घ्या, त्यामुळे आमच्या समरेणूच्या चित्रपटाला शो लावायला जागाच नाही, असे महेश डोंगरे म्हणाले.

तसेच म्हणाले की, मला सगळं संपल्या सारखं वाटत आहे. उद्या मी कुठे असेल माहिती नाही. पण पुढे काय होईल त्याला फक्त धर्मवीरची टीम जबाबदार असेल, असा त्यांनी धमकीवजा इशारा दिला. यावेळी ते दैनिक बोंबाबोंबच्या माध्यमातून आपले मत मांडत होते.

महेश डोंगरे यांनी एकनाथ शिंदेना देखील आवाहन केले आहे. म्हणाले, एका मराठी चित्रपटाला जगवण्यासाठी दुसऱ्या मराठी चित्रपटाला मारु नका. तुमची जी टीम आहे, धर्मवीर चित्रपटाची त्या टीमला सांगा असं काही करु नका. दोन्हीही चित्रपटाच्या टीमला सहकार्य करा. धर्मवीर चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तो किती कमाई करेल आणि त्याचा इतर चित्रपटाच्या कमाईवर किती परिणाम होईल पाहावं लागेल.

समरेणू चित्रपटाबाबत सांगायचे झाल्यास, ‘समरेणू’ ची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत. चित्रपटात महेश डोंगरे, रूचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सम्या आणि रेणूची ही प्रेमकहाणी आहे. येत्या 13 मे रोजी म्हणजेच आज चित्रपटगृहात ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now