Share

साऊथमधली आणखी एक जोडी तुटली, नागाचैतन्य पाठोपाठ धनुषनेही घेतला घटस्फोट

धनुषच्या चाहत्यांसाठी आज खूप धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनुषने त्याची पत्नी ऐश्वर्यापासून विभक्त होण्याची घोषणा केली. होय, सुपरस्टार धनुषने सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी करून सांगितले की, तो आणि ऐश्वर्या आता एकत्र नाहीत. धनुषने 18 वर्षांपूर्वी रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याशी लग्न केले होते.

धनुषने २०१४ मध्ये ऐश्वर्यासोबत लग्न केले. धनुषने विभक्त होताना सांगितले आहे की, अनेक वर्षे एकत्र मित्र म्हणून, जोडपे म्हणून आणि आई-वडील म्हणून, एकमेकांचे शुभचिंतक म्हणून प्रवास केला, एकमेकांना समजून घेतलं, ऍडॉप्ट केलं. आज आम्ही जिथे उभे आहोत तिथून आमचे रस्ते वेगळे होत आहेत.

ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, आम्हाला समजायला वेळ लागला की आम्ही वेगवेगळेच ठीक आहोत. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि तो हाताळताना आम्हाला प्रायवसी द्या. दरम्यान, धनुष आणि ऐश्वर्या एका कार्यक्रमात भेटले होते. त्यावेळी दोघे एकमेकांना ओळखत होते.

यानंतर एके दिवशी धनुष त्याच्या कुटुंबासह कढाल कोन्डैन चित्रपट पाहण्यासाठी गेला. जिथे सिनेमा हॉलच्या मालकाने रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि सौंदर्याची भेट धनुषशी करून दिली होती. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने धनुषसाठी घरी पुष्पगुच्छ पाठवला आणि त्यासोबत एक चिठ्ठी पाठवली, ज्यावर लिहिले होते, गुड वर्क, संपर्कात राहा.

धनुषला तिची ही शैली खूप आवडली. ऐश्वर्या धनुषच्या बहिणीला ओळखत होती आणि दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. यामुळे ती अनेकदा धनुषलाही भेटत असे. हळूहळू दोघांची मैत्री झाली. त्या दिवसांत धनुष इंडस्ट्रीत एक कलाकार म्हणून उदयास येत होता, त्यामुळेच मीडियाची नजर त्याच्यावर कायम होती.

दोघांना एकत्र पाहिल्यानंतर धनुष आणि ऐश्वर्या एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या. या बातमीनंतर इंडस्ट्रीत चर्चा सुरू झाली. या दोघांबद्दल सर्वत्र चर्चा रंगल्या होत्या, त्यामुळे दोघांचे कुटुंबीय चांगलेच नाराज झाले होते. ऐश्वर्या आणि धनुष खूप चांगले मित्र होते, त्यामुळे या अफवांमुळे दोघेही खूप नाराज झाले. त्यावेळी धनुष फक्त 21 वर्षांचा होता आणि ऐश्वर्या 23 वर्षांची होती.

या दोघांबद्दल उडणाऱ्या बातम्यांमुळे त्रस्त झालेल्या धनुष आणि ऐश्वर्याच्या कुटुंबीयांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 18 नोव्हेंबर 2004 रोजी धनुष आणि ऐश्वर्याचे तामिळ रितीरिवाजांनुसार लग्न झाले. रजनीकांत यांच्या घरी हे लग्न पार पडले. रजनीकांतने आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात केले होते. या लग्नानंतर ग्रँड रिसेप्शनही देण्यात आले होते. ग्रँड रिसेप्शनमध्ये गर्दी पाहता स्वागतासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! अभिनेता धनुषने रजनीकांतच्या मुलीला दिला घटस्फोट; म्हणाला, इथून पुढे आपले रस्ते..
कोण आहेत मनोज परब ज्यांना लोक गोव्याचे राज ठाकरे म्हणत आहेत? वाचा त्यांच्याबद्दल..
क्रिप्टोबाजार हादरला! १००० रुपयांचे झाले ३००० कोटी, एकता क्रिप्टोकरन्सीची कमाल
‘’घराणेशाहीला विरोध करता करता भाजपात कधी घराणेशाही घुसली भाजपाला समजलच नाही?’’

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now