सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यापासून करूणा मुंडे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील आणि करूणा मुंडे यांची नुकतीच चर्चा मॅक्स वुमनने घडवून आणली आहे. यावेळी ‘धनंजय मुंडे यांची सुप्रिया सुळे यांच्याबाबतीत विचारसरणी बरी नाही’ असा खुलासा करूणा मुंडे यांनी केला आहे.
इतकेच नव्हे तर, याबाबतची रेकॉर्डिंगही माझ्याकडे असून ती मी शरद पवारांना ऐकवणार असल्याचे करूणा मुंडेंनी मॅक्स वुमनला सांगितले आहे. पुढे बोलताना, “धनंजय मुंडे यांनी स्वतः माझी आणि मुलांची भेट सुप्रिया सुळे आणि शरद पवारांशी घालून दिली होती. पण त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा आपल्याच एका नेत्याची पत्नी म्हणून शरद पवारांना साधी विचारपूसही करावीशी वाटली नाही” अशी खंत करूणा मुंडेंनी व्यक्त केली आहे.
मॅक्स वुमनच्या चर्चा सत्रात तुम्ही कधी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची भेट मागितली होती का? असा सवाल करूणा मुंडेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “सुप्रिया सुळेंना मी चार ते पाच फोन केले पण त्यांनी एकदा ही कॉलबॅक केला नाही. तेच शरद पवारांना कॉल केले तर त्यांच्या ऑफीसवरून मला बोलावणं आलं आणि मी हे धनंजय मुंडेंना सांगितलं. हाच माझा मुर्खपणा ठरला.” असे करूणा मुंडेंनी म्हणले आहे.
तसेच “धनंजय मुंडे यांना सांगितल्यानंतर मला पुन्हा शरद पवारांचा फोन आला आणि त्यांनी भेट नाकारली.” अशी माहिती त्यांनी मॅक्स वुमनला दिली आहे. यासोबतच शेवटच्या चर्चा सत्रात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप लावत, सुप्रिया सुळेंबाबत धनंजय मुंडेंचे मत, विचारसरणी चांगली नसल्याचे सांगितले आहे. या संदर्भातील लवकरच सर्व पुरावे करुणा मुंडे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना दाखवणार आहेत.
दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत करुणा मुंडे यांना मोठी हार पत्करावी लागली आहे. करुणा शर्मा यांचे डिपॉझिट देखील या निवडणुकीत जप्त करण्यात आले आहे. यानंतरच मॅक्स वुमनसोबत घडलेल्या चर्चेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी खुलासे केले आहेत. मात्र अद्याप यावर धनंजय मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
27 मंदिरे पाडून बांधली गेली कुतुबमिनार जवळील मशीद, प्रसिद्ध इतिहासकारांचा मोठा दावा
सर्वात पहीले ‘हे’ भोंगे बंद करा; बच्चू कडूंनी दिलेले चॅलेंज सर्वच राजकीय पक्षांना झोंबणार?
आता दरमहा तुमच्या खात्यात 10,000 रूपये जमा होणार, सरकारने आणली नवीन योजना
बॉलिवूडवर शोककळा! अमिताभ बच्चनला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं दुःखद निधन