Share

Dhananjay Munde: …त्यामुळे धनंजय मुंडेंनी तब्बल दोन वेळा घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट, चर्चांना उधाण

dhanjay munde fadanvis

धनंजय मुंडे(Dhananjay Munde): देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्र्यांची दोनदा भेट घेतली. भेट घेण्यासाठी ते मंत्रालयात गेले होते. देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी एकदा रात्री उशीरा फडणवीसांच्या सागर बंगल्यावरसुद्धा ते गेले होते. ही सदिच्छा भेट असल्याचं मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं होतं.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातला शेतकरी संकटात अडकलेला आहे. आधी उन्हाळा आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी शेतकऱ्यांनी पेरलेली पिकं मातीमोल केलेली आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतल्याचं मुंडे यांनी सांगितलं. गोगल गाईमुळे 10 हजार हेक्टर जमिनीतील पीकं खराब झाली आहेत. काल जो निर्णय घेतला त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत होणार नाही. गोगलगाईने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी धंनजय मुंडे यांनी फडणवीसांना केली.

संकटं ही शेतकऱ्याचा पाठलाग नेहमी करीत असतात. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी नापिकी, तर कधी कीड, त्यामुळे राज्यातला शेतकरी बेजार झालाय. गेल्या दोन अडीच वर्षात कोरोनामुळे लागलेल्या निर्बंधाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. इतकी संकटं समोर असताना शेतकऱ्यांना आता भरघोस मदतीची गरज आहे.

पुढे मुंडेंनी सांगितलं,
आतापर्यंत पंचनामेही झाले नाहीत. आपण तात्काळ पंचनामे करावेत, असं मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे. दोन व्यक्ती सरकार चालवत होते. आतापर्यंत खातेवाटपही झालं नव्हतं. जेव्हा लोकांच्या अडचणी संपतील तेव्हा राज्यात सरकार आलं असं लोकांना वाटेल.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची टीका
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत शेतकऱ्यांना दिली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा फसवी आणि धुळफेक करणारी आहे, असे म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली.

महत्वाच्या बातम्या
Priya Bapat: अब पैसा कौन देगा रे? प्रिया बापटला का पडली पैशांची गरज? वाचा नेमकं काय घडलं 
BJP : भाजपच्या माजी खासदाराचे कर्करोगामुळे निधन, दोन दिवसांपुर्वीच फडणवीसांनी घेतली होती भेट
Eknath Shinde : शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मंत्रिपद न मिळाल्याने ‘हे’ पाच आमदार नाराज
Tata punch : टाटाच्या ‘या’ स्वस्त कारने घातला धुमाकूळ, ओलांडला १ लाखांचा टप्पा, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

 

राजकारण ताज्या बातम्या राज्य शेती

Join WhatsApp

Join Now