Share

Tuljapur : धक्कादायक! तुळजापूरला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ५ जण जागीच ठार

accident

Tuljapur : नवरात्र उत्सवाच्या दरम्यान अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी शक्तीपीठांना भेटी देत असतात. मात्र देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आणि त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा कानावर पडतात. अशाच प्रकारे मोठी धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या उदगीर येथील भाविकांचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्यांना प्राण गमवावा लागला.

देवीचे दर्शन घेऊन स्विफ्ट कारने परतत असताना भाविकांच्या कारची एसटी बससोबत मोठी धडक झाली. स्विफ्ट कार भरधाव वेगाने येणाऱ्या बसला धडकली आणि हा मोठा अपघात घडून आला. धडक एवढी प्रचंड होती की कारचा चक्काचूर झाला. कारमधील पाच जण जागीच ठार झाले.

या कारमधील पाच जणांचा मृतदेह बाहेर काढताना कारचा पत्रा गॅस कटरने कापावा लागला. व त्यानंतर आतील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातात कारमध्ये असलेल्यांपैकी एक व्यक्ती बचावली आहे. प्रियंका बनसोडे (वय २२) असे तिचे नाव असून या भीषण अपघातामुळे मोठा धक्का तिला बसला आहे.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्वांना रुग्णालयात नेले. यामध्ये पोलिसांनी बाहेर काढलेल्या मृतदेहांची ओळख पटली असून ते मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. अचानक झालेल्या या भीषण अपघातात जागीच ठार झालेल्या त्या पाच जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अमोल खेडकर (वय २१ ,उदगीर), अमोल देवकाते (वय २४, रावळकोत, नांदेड), कोमल कोद्रे (वय २२, नांदेड), यशोमती देशमुख (वय २८, यवतमाळ), नागेश गुंडेवार (वय २७, उदगीर), अशी भीषण अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

तुळजापुरला देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या या भाविकांचा उदगीरकडे परतत असताना हैबतपुर पाटीजवळ भीषण अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून क्रेनचा वापर करून अपघाती कारला बाजूला केले. एसटी बसची देखील समोरची काच फुटली असून ड्रायव्हरच्या बाजूच्या चाकाला फटका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-
devendra fadnavis : ‘दसरा मेळाव्यात कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, अन्यथा…,’ फडणवीस स्पष्टच बोलले
cricket : लाहोरचं जेवण चांगलं होतं पण कराचीमध्ये.., मोईन अलीने सगळ्यांसमोर काढली पाकिस्तानची लाज
shivsena : मोठी बातमी! संजय राऊतांचा दसरा तुरूंगातच, न्यायलयीन कोठडीतला मुक्काम वाढला

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now