Share

‘मी आतापर्यंत १३७ मुलांना लग्नास दिलाय नकार’, प्रसिद्ध अभिनेत्रीने मुलाखतीत केला खुलासा

‘देवों के देव महादेव’ या मालिकेद्वारे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सोनारिका भदोरिया. आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकण्यासोबतच सोनारिका आपल्या सौंदर्यानेही चाहत्यांना भुरळ घालत असते. सोनारिकाला पाहताच कोणीही तिच्या प्रेमात पडू शकतो. अशी ही परमसुंदरी एक दोन नाही तर १०० पेक्षा जास्त लोकांना तिच्या प्रेमात अडकवलं आहे. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना. चला तर जाणून घेऊया याबाबत.

सोनारिकाच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. सोबतच तिच्या सौंदर्याचेही लाखो दिवाने आहेत. मालिकेत साध्या आणि सोज्वळ भूमिकेत दिसणारी सोनारिका खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे. सोशल मीडियाद्वारे ती नेहमी तिचे अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंद्वारे सोनारिका नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.

सोनारिका आता २९ वर्षांची आहे. मात्र, तिच्या फोटोंवरून तिच्या वयाचा अजिबात अंदाज येत नाही. २९ वर्षाच्या सोनारिकाने अद्याप लग्न केलं नाही. मात्र, तिने १०० पेक्षा अधिक मुलांना लग्नास नकार दिला आहे. याचा खुलासा स्वतः सोनारिकाने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

 

सोनारिकाने सांगितले की, कॉलेजमध्ये शिकत असण्यादरम्यान तिच्या घरी शेकडो लग्नाचे स्थळ यायचे. अद्यापही तिच्यासाठी अनेक स्थळ येत आहेत. पण तिला लग्न करायचं नाही. त्यामुळे तिने त्यास नकार दिला. आतापर्यंत सोनारिकाने १३७ मुलांना लग्नास नकार दिल्याचे तिने सांगितले. सोनारिकाचे म्हणणे आहे की, हे वय लग्न करण्याचे नसून काम करण्याचं आहे.

सोनारिका भदोरिया एक अभिनेत्री असण्यासोबतच प्रसिद्ध मॉडेलसुद्धा आहे. ‘देवों के देव महादेव’ या मालिकेमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. मालिकेत आपल्या अभिनयाद्वारे तिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. देवी पार्वतीच्या भूमिकेद्वारे तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

सोनारिकाचे नाव दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही प्रसिद्ध आहे. तिने आतापर्यंत ‘जादूगाडू’, ‘स्पीडुन्नोडू’, ‘इदो रकम आदो रकम’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर सोनारिकाला आता बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

‘मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ, जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा’
‘सिनेमा झाला आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झाली’, विजू मानेंची पोस्ट चर्चेत

मुलाखत देताना बदनामी केली म्हणून सलमानने शेजाऱ्यावरच दाखल केला गुन्हा, वाचा संपुर्ण प्रकरण

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now