बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल हे कोणालाच कळत नाही, इथे मस्ती करणार्याचा ताबा कधी सुटतो हे कोणालाच कळत नाही. आता नुकताच अभिजीत बिचुकलेसोबतही असाच प्रकार घडला आहे. आपल्या वागण्याबोलण्याने सर्वांना हसवणारे अभिजीत आणि देवोलिना भट्टाचार्जी यांच्यात पुन्हा एकदा लढत झाली. त्यानंतर अभिजीतने देवोलीनाला असे काही म्हटले की, अभिनेत्रीने त्याचा क्लास घेतला.
वास्तविक, साथ निभाना साथिया अभिनेत्री अभिजीतवर रागावली होती कारण तो रश्मी देसाई, उमर रियाझ आणि इतरांसोबत सामील झाला होता जेणेकरून तिकीट टू फिनाले टास्क रद्द होईल. जेव्हा बिग बॉसने त्यांच्या रणनीतीबद्दल खुलासा केला तेव्हा देवोलीनाने अभिजीतला प्रश्न केला आणि त्याला विचारले की तो तिच्याशी एकनिष्ठ आहे का? देवोलीनाने अभिजीतला विचारले कि त्याने याबद्दल तिला का सांगितले नाही.
काही वेळाने देवोलिना आणि अभिजीतमध्ये पुन्हा वाद वाढला आणि देवोलीनाने अभिजीतवर फसवणुकीचा आरोप केला. देवोलीनाने अभिजीतसाठी चुकीचे शब्द वापरले आणि म्हणाली तो कधीच तिचा मित्र होऊ शकत नाही. अभिजीत म्हणतो की, ती त्याला असे का म्हणत आहे आणि शिवीगाळ करण्यासही नकार देतो.
पण देवोलीना काहीही ऐकत नाही आणि त्याला जनावरांपेक्षा खालच्या दर्जाचा असल्याचे म्हणते. इतकंच नाही तर तुझ्यासारखा मित्र असण्यापेक्षा गाढव पाळणं चांगलं असल्याचंही ती सांगते. ती म्हणते कि तू मित्राच्या नावावर डाग आहेस.
यानंतर, जेव्हा देवोलिना बेडरूमच्या बाहेर जाते तेव्हा रश्मी, निशांत भट्ट, उमर रियाझ आणि अभिजीत तिची खिल्ली उडवतात आणि तिच्या प्रतिक्रियेवर हसतात. बाहेर असताना तेजस्वी देवोलीनाला शांत करण्याचा प्रयत्न करते. यानंतर देवोलिनाही रडू लागते.
वातावरण थोडं शांत होतेय तेच वादाला तोंड फुटतं. अभिजीत देवोलीनाला त्रास देतो. मग ती अभिजीतला नको ते बोलू लागते आणि यावेळी अभिजीतही स्वतःवरचा ताबा सुटतो. तो प्लेट उचलतो आणि रागाने खाली फेकतो.
घरचे बाकीचे स्पर्धक मग परिस्थिती हाताळायला येतात. शमिता अभिजीतला समजावून सांगते की तो बिग बॉसच्या घरातील सामान अशा प्रकारे खराब करू शकत नाही. आता वीकेंड का वार मधील अभिजीतच्या या कृतीवर सलमान खान काय क्लास घेतो ते पाहूया.