‘साथ निभाना साथिया’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे देवोलिना भट्टाचार्य. गोपी बहू या आपल्या भूमिकेद्वारे देवोलिनाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यानंतर नुकताच संपन्न झालेल्या ‘बिग बॉस’ शोच्या १५ व्या सीझनमध्येही देवोलिनाने प्रबळ स्पर्धेक म्हणून लोकप्रियता मिळवली होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर देवोलिनाने आता चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. देवोलिनाने तिच्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला (Devoleena Bhattacharjee and Vishal Singh) असून यादरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
देवोलिनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत असून तिच्या हातात अंगठीसुद्धा दिसून येत आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोत देवोलिनाला तिचा बॉयफ्रेंड हातात अंगठी धरून गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसून येत आहे. देवोलिनाचा बॉयफ्रेंड म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत तिच्या दीराची भूमिका साकारणारा अभिनेता विशाल सिंह होय.
विशाल आणि देवोलिनाच्या साखरपुड्याचे हे फोटो समोर येताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण विशाल आणि देवोलिना एकमेकांना डेट करत असल्याची माहिती कोणालाच नव्हती. दोघांनीही त्यांचे नाते खूपच सीक्रेट ठेवले. तर २ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियाद्वारे त्या दोघांनी त्यांचे नाते अधिकृतपणे जाहिर केले आहे.
देवोलिनासोबत विशालनेही त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघेही फारच खुश दिसून येत आहेत. फोटो शेअर करत विशालने लिहिले की, आता हे अधिकृत झाले. आय लव्ह यू देवोलिना. तर विशालच्या या पोस्टवर देवोलिनानेही कमेंट करत लिहिले की, ‘येsss शेवटी…. आय लव्ह यू विशू’.
विशाल देवोलिनाच्या या फोटोंवर चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही कमेंट करत दोघांना शुभेच्छा देत आहेत. तर अनेकजण या दोघांच्या नात्यावर मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने लिहिले की, ‘गोपी बहू विथ जिगर जी’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘अहम कुठे आहे?’ तसेच अनेकजण कमेंट करत ‘हे खरं आहे का?’ असा प्रश्न विचारत आहेत. एकंदरीत विशाल-देवोलिनाच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसल्याचे लक्षात येत आहे.
दरम्यान, विशाल सिंह हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत देवोलिनाचा दीर अर्थात जिगर ही भूमिका त्याने साकारली होती. याशिवाय त्याने ‘कुछ इस तरह’, ‘कसम से’, ‘कुमकुम भाग्य’ यासारख्या मालिकेतही त्याने काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
सारा अली खान झाली oops moment ची शिकार, कारमधून उतरताना घसरली पॅन्ट; पहा व्हिडिओ
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दोन दिवसांपूर्वीच साजरा केला होता 93वा वाढदिवस
‘सरकारचा हा क्रांतिकारी निर्णय’, केंद्राने घेतलेल्या महिलांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाचे कंगनाने केले स्वागत