Share

“यापुढे फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत”, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदेंची उडाली झोप

devendra fadanvis

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे बडे नेते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मैदानात उरतले आहेत. आताच्या शिंदे – फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्विकारला आहे. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत.

मात्र यापुढे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे, असे एका भाजप नेत्याने म्हंटलं आहे. भाजप नेत्याच्या या व्यक्तव्याचे आता काय पडसाद उमटणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काल नाशिक दौऱ्यावर असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे व्यक्तव्य केलं आहे.

वाचा नेमकं काय म्हंटलंय?
आगामी मुख्यमंत्री पदावर भाष्य करताना बावनकुळे यांनी म्हंटलं आहे की, ‘याठिकाणी मी मुख्यमंत्री झालो पाहिजे, असा उल्लेख झाला. मात्र, तसं पाहता फडणवीस हे राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वान व्यक्ती लोकनेते आहेत. यामुळेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हेच राहिले पाहिजे.’

बावनकुळे हे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी केलेलं व्यक्तव्य आता चर्चेचा विषय बनला आहे. पुढे बोलताना  बावनकुळे म्हणाले की, ‘माझं तिकीट कापलं गेलं. तेव्हा मला वाटलं नव्हतं की, मी पुन्हा आमदार होईन. राज्याचा नेता होईन. पण वरिष्ठ नेत्यांनी मला संधी दिली.’

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘मी 1992 साली शाखेचा अध्यक्ष झालो. त्यावेळी सगळीकडे काँग्रेस पक्षाला स्थान होते. मात्र तेव्हा भाजपला अत्यंत कमी मते मिळत होती. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, अन् मला आमदार, मंत्री तसेच आता राज्याचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी दिली.’

‘यापुढे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे,’ बावनकुळे यांच्या या व्यक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरू आहे. बावनकुळे यांच्या या विधानावर अद्याप शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये. सध्या राज्याचे लक्ष शिंदे गटाच्या भूमिकेकडे लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
जेव्हा भारताचे विमान हायजॅक झाले तेव्हा पाकिस्तानने केली मदत, किस्सा वाचून विश्वास बसणार नाही
सायरस मिस्त्रींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणाऱ्या सिमोन टाटा कोण? रतन टाटांशी आहे थेट संबंध
संजय राउतांना बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरेंचे ठेत भाजपसोबत ‘सेटलमेंट’? राजकीय समीकरण बदलणार
Solapur: बाप्पा असं का केलंस? २ वर्षांपुर्वी आईची आत्महत्या, विसर्जनाला बाबांचा बुडून मृत्यु, चिमुकला पोरका

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now