Devendra Fadnavis : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या जीआरवर राज्य सरकारने घेतलेला निर्णय त्वरित रद्द करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, “आम्ही कोणत्याही पक्षाच्या हितासाठी निर्णय घेतलेले नाही. आमचा निर्णय महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.”
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री फडणवीस (Fadnavis) यांनी ठाकरे बंधूंबद्दल बोलताना स्पष्ट केले की, “दोन भावांनी एकत्र येऊ नये असं काही जीआर आम्ही काढलेलं नाही. ते एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, जेवण करावं, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही.”
राज्यातील शाळांमध्ये हिंदीची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र संबंधित जीआर राज्य शासनाने रद्द केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यकाळात एक शिफारस करण्यात आली होती आणि त्या शिफारशीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे हिंदीचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाला. हे दुटप्पी लोक आहेत. याचं सत्तेतले रुप वेगळं आणि विरोधातले रुप वेगळं आहे.”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा
हिंदी भाषेच्या जीआरवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी केली होती. परंतु, त्यांचं विरोध मोर्चा आता रद्द झाला असून ते विजयी मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका समितीची स्थापना केली आहे, जी राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबत निर्णय घेईल. फडणवीस (Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, “आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घेऊ, कुठल्याही दबावाखाली झुकणार नाही.”