महाराष्ट्रातील राजकीय सत्ता संघर्षावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. परंतु निश्चित असा कोणताही निर्णय आज न्यायालयातून आला नाही. त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले, अशी माहिती समोर आली आहे. (Devendra Fadnavis hastily left for Delhi?)
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुपारी १ वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली. दिवसभरातील इतरही कार्यक्रम रद्द करून देवेंद्र फडणवीस त्यांच्या सागर बंगल्यावर गेले आणि तेथून दिल्लीला जात आहेत.
एवढ्या तातडीने उपमुख्यमंत्री फडणवीस पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी निघाले. त्यावरून या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ठोस निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्यायालयात सुनावणी दरम्यान शिंदे गटाच्या वकिलांनी तसेच शिवसेनेच्या वकिलांनी युक्तिवाद केला. परंतु निश्चित असा निर्णय न्यायालयाने दिला नसून या प्रकरणाची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.
कोर्टातील प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंबच होत आहे. सरकार स्थापनेनंतर महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे चहूबाजूंनी सरकारवर टीका होत आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून याबाबतीत वेगाने हालचाली सुरू असल्याचे दिसते.
सततच्या बैठका, दौरे, सभांमुळे अती थकवा आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांनी सक्त विश्रांती घेण्याचे सांगितले आहे. अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीला जाणे, ही बाब अनेक अर्थाने महत्त्वाची आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोकणचा सुपुत्र होणार भारताचा नवे सरन्यायाधीश; सद्याचे सरन्यायाधीश रमणा यांनीच सुचवले नाव
Eknath shinde group: फक्त १६ आमदार नाही तर पुर्ण ३८ आमदार अपात्र ठरू शकतात, कायदेतज्ञांनी सांगितलं विश्लेषण
Rahul gandhi: राहुल गांधींनी स्विकारला लिंगायत पंथ, मठातील संतांनी दिला पंतप्रधान होण्याचा आशिर्वाद