Share

Devendra Fadnavis : फक्त पाचच शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा लावला निकाल ; म्हणाले, निव्वळ..

uddhav thackeray with fadanvis

Devendra Fadnavis : शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर होणाऱ्या पहिल्याच दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतील? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. उद्धव ठाकरेंनी काल शिवतीर्थावर आपल्या भाषणात शिंदे गटावर, भाजपवर, नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर शिंदे गटाकडून व इतर लोकांकडून त्याबाबत प्रतिक्रियाही आल्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना आता प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाला निव्वळ शिमगा होता. त्यात काहीही अर्थ नव्हता, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचे भाषण निकाली काढले. उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत कोणतेही थेट वक्तव्य न करता त्यावर बोलणेच फडणवीस यांनी टाळले, असे यावरून दिसते. मात्र त्याचवेळी त्यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुकही केले आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत त्यांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे निव्वळ शिमगा होता. त्यापलीकडे त्यात काहीही नव्हते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मी काल नागपूरमध्ये धम्मचक्र परिवर्तनाच्या कार्यक्रमात होतो. त्यामुळे मी दोघांचे भाषण ऐकले नाही.

मात्र नंतर दोन्ही भाषणाचा सारांश माझ्यापर्यंत पोहोचला. युट्यूबवर थोडेफार एकनाथ शिंदे यांचे भाषण मी ऐकले. मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदेंचे मी कौतुक करेल की, त्यांनी शिवसेना कोणाची आहे? हे दाखवून दिले. बीकेसीवरील गर्दी पाहून हे स्पष्ट होतेच. शिवाजी पार्कच्या दुप्पट बीकेसी मैदानाची क्षमता आहे. तरीदेखील बीकेसी मैदान तुडुंब भरले होते, असं फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणवर फार प्रतिक्रिया न देता ठाकरे यांना अनुउल्लेखाने मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फडणवीस करताना दिसले, असे म्हणले येईल. मात्र दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची स्क्रिप्ट फडणवीस यांनी लिहिली होती, असा जो आरोप झाला. त्यावर फडणवीस यांनी टीका केली आहे.

फडणवीस त्याबाबत बोलताना म्हणाले, ‘जे असं म्हणतात त्यांनीच आपला स्क्रिप्ट रायटर बदलायला हवा. तुमच्या स्क्रिप्ट रायटरला जरा क्रिएटिव्हिटी दाखवायला सांगा. नाहीतर तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला. तेच तेच ऐकून आम्हाला कंटाळा आलाय,’ असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

महत्वाच्या बातम्या-
Urvashi Rautela: डान्स करता करता उर्वशी कॅमेऱ्यासमोरच झाली बेकाबू, टॉप काढून दाखवल्या घायाळ करणाऱ्या अदा
Dasara melava : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फजिती; सभा सुरू असतानाच लोकांनी घेतला काढता पाय, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde : शिंदेंच्या व्यासपीठावर ठाकरेंची सून; एकनाथ शिंदेंचं केलं तोंडभरून कौतूक, राजकीय वर्तुळात चर्चा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now