Share

‘मविआ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ सोमय्यांना दिलेल्या नोटीशीमुळे फडणवीसांचा हल्लाबोल

udhav thackeray

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी मंत्रालयात जाऊन कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने खळबळ उडाली आहे. तसेच सोमय्या यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून सरकारी फाईल तपासल्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल घेतली असून मुख्य सचिव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. (devendra fadnavis criticizes mahavikas aghadi gov)

या प्रकरणी आता तीन जणांना करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन नियोजनकार आणि एक कक्ष अधिकारी अशा तीन जणांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. याचाच धागा पकडत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर तिखट शब्दात टीका केली आहे.

‘मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा, असे फडणवीस यांनी ट्विट करत म्हंटले आहे.

‘मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते. सरकारी कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना सुद्धा नोटीसा! हाच का तुमचा पारदर्शी कारभार?’ असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1485956258272190467?s=20

दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावर आक्षेप घेत सोमय्यांवर कारवाईची मागणी केली. यानंतर सोमय्या यांनी या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली. मी माहितीसाठी कठेही जाते आणि यापुढेही जाणार आहे, असं मत सोमय्यांनी व्यक्त केलं.

तसेच माझी आणखी एक चौकशी होऊ जाऊ दे, असं आव्हान ठाकरे सरकारला दिलंय. सोमय्या म्हणाले, “त्यांना नेमकी भीती कसली आहे, कोणत्या कोणत्या फाईल तपासल्या त्याची की वायकरची फाईल होती, की सरनाईकची फाईल होती की अशोक चव्हाण यांची फाईल होती याची भीती आहे? मला वाटतं भीती ती आहे. आम्हाला जगभरातून माहिती मिळते. यात उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाण यांच्यापर्यंत समावेश असतो.”

दरम्यान, नगरविकास खात्यात फायली चेक करत असल्याचा सोमय्या यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतला. भाजप नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन बेफाम झालं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी भाजप नेते कोणत्याही स्तरावर जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
अर्ध्या तासात १० लाख गोळा करून सेल्समनची जिरवणारा तो शेतकरी कशाची शेती करतो?
व्वा रे पठ्ठ्या! ना घोडा, ना कार थेट JCB वरून नवरदेव घेऊन आला वरात; वाचा लग्नाची भन्नाट गोष्ट
किरीट सोमय्यांना खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांची खुर्ची धोक्यात? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश
लहान मुलांना मदत न केल्यानं नॅशनल क्रश रश्मिका ट्रोल; लोकं म्हणाली एवढे पैसे कमावून काय उपयोग

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now