शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर भाजप(BJP) नेत्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.(devendra fadanvis first reaction after the fall of the Thackeray government on)
भाजपच्या नेत्यांनी एकमेकांना मिठाई चारत ठाकरे सरकार कोसळल्याचा आनंद साजरा केला आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘अडीच वर्षानंतर स्थापन होणार सरकार २५ वर्षे टिकेल’, असं विधान भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
ठाकरे सरकार कोसळल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या संपूर्ण लढाईमध्ये भाजप आमदारांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. शिंदे गटाने निर्णायक भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे मी आभार मानतो. आता शपथ घेऊ आणि नंतर जल्लोष करू. पुढील काळात आपण एक स्थिर सरकार देऊ. “, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “आता उतायचं नाही. मातायचं नाही. जनतेचं काम करायचं. आपण सर्वांनी मिळून एक टीम म्हणून का केलं. यामुळे मी तुमचे आभार मानतो”, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला म्हणून आपण उन्माद करायचा नाही, असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.
२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे सरकार स्थापन होणार अशी चर्चा सर्वत्र रंगत होती. त्या दृष्टिकोनातून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा देखील होत होती. पण शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. या मागणी भाजप नेत्यांचा विरोध होता.
त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामधील युती तुटली. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचा पाठिंबा मिळवत सरकार स्थापन केले. पण हे सरकार फक्त ८० तास टिकू शकले. भाजपचे सरकार पडल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.
महत्वाच्या बातम्या :-