Share

Devendra Fadanvis : शिवसेना बेईमान होती, त्यांच्या बेईमानीचा बदला मी घेतला, मला त्याचा आनंद – फडणवीस

devendra fadanvis uddhav thackeray

devendra fadanvis criticize uddhav thackeray  | राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षातील नेते वेगवेगळ्या मुद्यांवरुन सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. तसेच त्याला सत्ताधारी नेतेही उत्तर देताना दिसून येत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या आणि आपल्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचे कसलेही आश्वासन देण्यात आलेले नव्हते. शिवसेना बेईमान होती. त्यामुळे त्यांच्या बेईमानीचा बदला घेतला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

२०१९ ची विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढली होती. पण त्यानंतर निकाल लागला तेव्हा दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन मतभेद झाले. यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. नव्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते.

अशात जून महिन्यात एकनाथ शिंदे हे ५० आमदारांसोबत बाहेर पडले आणि भाजपसोबत मिळून नवीन सरकार स्थापन केले. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यातील राजकीय मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे.

शिवसेनेने आमच्यासोबत बेईमानी केली. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा येण्याची संधी शोधत होतो. आम्ही काही तपस्या करण्यासाठी किंवा साधू संत होण्यासाठी येथे आलेलो नाही. आम्ही राजकीय नेते आहोत. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. आमच्यासोबत बेईमानी झाली, तर आम्ही त्याचे उत्तर देणारच, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना चुकीची वागणूक दिली होती. त्यामुळे ते बाहेर पडले. आता ते बाहेर पडल्यावर आम्ही थोडी असे म्हणणार आहोत की, शिंदेजी तुम्ही परत जा. आम्ही तर असेच म्हणू की फारच छान झाले तुम्ही बाहेर पडलात. आम्हालाही आमचा बदला घ्यायचा होता. जी बेईमानी माझ्यासोबत झाली होती, मी त्याचा बदला घेतला. याचा मला आनंद आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
India : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचा ७१ धावांनी दणदणीत विजय, ‘हे’ खेळाडू ठरले सामन्याचे हिरो
kl Rahul : दोन अर्धशतकानंतर लगेचच अहंकारी झाला केएल राहूल? केले ‘हे’ हैराण करणारे वक्तव्य
Pakistan : अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव, ५ विकेट्सने सामना जिंकत पाकिस्तान सेमी फायनलमध्ये

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now