devendra fadanvis ashish shelar in election | अंधेरीच्या पोटनिवडणूकीत भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे उमेदवारीचा अर्ज भरुनही भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना माघार घ्यावी लागली आहे. देवेंद्र फडणवीसाच्या या खेळामुळे भाजपचे आशिष शेलार हे तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे.
शिवसेनेत होणाऱ्या मोठ्या बंडानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक होती. पण त्यातच शिंदे गटाने उमेदवार न देणं आणि आता भाजपने उमेदवारी मागे घेणं यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच भाजपला आपला पराभव दिसत असल्यामुळे भाजपने माघार घेतल्याची चर्चा आहे.
भाजपने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुरजी पटेल हे आपले उमेदवार मुअसेल अशी घोषणा केली होती. पण दोनच दिवसांत म्हणजे सोमवारी भाजपने माघार घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले होते.
मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यास प्रदेश सुकाणू समितीतील नेत्यांचे अनुकूल मत नव्हते. पण तरीही आशिष शेलार यांनी दुसरा उमेदवार नसल्याचे म्हटले होते. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांकडून विरोध असूनही शेलारांमुळे फडणवीसांनी मुरजी पटेलांना उमेदवारी दिली होती.
अंधेरी मतदार संघात ठाकरे गटाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे निवडणूक झाली, तर भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल. तसेच आगामी काळात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणूकीसाठी पक्षाच्या प्रतिमेलाही धक्का बसेल अशी भूमिका फडणवीसांकडे मांडली होती.पण शेलार मात्र आपल्या भूमिकेवर कायम होते.
अशात रविवारी पुन्हा एकदा शेलार, भाजपचे केंद्रीय प्रभारी सी टी रवी आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर ही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यामुळे शेलार हे तोंडघशी पडल्याचे दिसत आहे. मुरजी पटेल हे आशिष शेलार यांचे खुप विश्वासू असून त्यामुळेच भाजपने त्यांना उमेदवारी मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या-
devendra fadnavis : निवडणुकीतून माघार घेण्यासाठी कुणाचा दबाव, मुरजी पटेलांनी स्पष्टच बोलले, भाजपमध्ये पडली वादाची ठिणगी
Urfi Javed : मोठी शेर तर बारकी सव्वाशेर! उर्फीपेक्षा तिची बहीण डाॅली आहे खूपच हाॅट; फोटो पाहून फुटेल घाम
Udaya Samant : एका मताने गेम पालटला! उदय सामंतांच्या गडाला मविआने पाडलं खिंडार, केला दारूण पराभव