eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. शिंदे – फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून आरोप – प्रतारोपांचे सत्र सुरू झाले आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी देखील आता खळबळजनक आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
काही दिवसांपूर्वी विधानपरीषद निवडणूकीत विरोधी मत केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यावर भुयार यांनी देखील राऊतांवर सडकून टिका केली होती. मात्र आता त्यांनी शिंदे गटावर टीका करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच तोंड भरून कौतुक केलं आहे.
माध्यमांशी बोलताना वरुड – मोर्शीचे आमदार भुयार शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘अलिबाबा और चालीस चोर’ असा उल्लेख करून आमचा कोट्यवधीचा निधी रोखला, अशी जळजळीत टीका भुयार यांनी केली आहे.
पुढे बोलताना भुयार यांनी म्हंटलं आहे की, राज्याचे ५० गद्दार गुजरातमार्गे गुवाहाटीला गेले आणि महाविकास आघाडी सरकार पाडले. शुक्रवारी वरूड येथे भुयार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते.
तर दुसरीकडे निधी रोखल्याबाबत आमदार भुयार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. ‘मला भाजपमध्ये जायचे होते, तेव्हाच गेलो असतो, असं भुयार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. एवढंच नाही तर गुवाहाटीमध्ये मौजमजा केली असती आणि ५० खोके घेऊन आलो असतो, असा टोमणा देखील मारला.
दरम्यान, ‘गद्दारी माझ्या रक्तात नाही. माझ्या लग्नात फडणवीस आले. त्यांची माझी रास एक आहे. ते लग्नाला आले म्हणजे मी भाजपमध्ये गेलो, असे होत नाही. पण, विरोधकांनी त्याचेही भांडवल केल्याचा आरोप देखील भुयार यांनी केला आहे. भुयार हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
पुढे बोलताना भुयार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल भाष्य केलं आहे. मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे आणि उद्याही राहील, हे कोणीही नाकारू शकत नाही, असेही आमदार देवेंद्र भुयार म्हणाले आहे. शिंदे गटावर निशाणा साधताना त्यांनी म्हंटलं आहे की, सत्तेसाठी काही गद्दारांनी ठाकरेंना धोका दिला. मात्र आगामी काळात मतदार त्यांना जागा दाखवून देतील, असं भुयार यांनी म्हंटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल