Share

Asia Cup : …तर पराभवानंतरही आशिया चषकाच्या फायनलमध्ये जाऊ शकतो भारतीय संघ; आहे ‘हा’ एकमेव मार्ग

Team India

Asia Cup : काल (मंगळवार) रात्री आशिया कपच्या सुपर फोरमधील सामन्यांत श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचा ६ विकेट्सने पराभव झाला. भारतीय गोलंदाजांना या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे १७४ धावांचे मोठे लक्ष देऊनही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला.

आशिया कपमधील हा भारताचा सलग दुसरा पराभव आहे. सुरुवातीलाच श्रीलंकेच्या सलामी जोडीने जोरदार सुरुवात केली. यावेळी कुसल मेंडिस व पथूम निसंका यांनी ९७ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने ठेवलेले विजयासाठीचे १७४ धावांचे लक्ष्य हे दोघेच पार करतील असे सर्वांना वाटू लागले होते.

मात्र, भारतीय संघाच्या चहल आणि अश्विन या फिरकीपटूंनी श्रीलंकेच्या ४ विकेट्स घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणले. यावेळी चहलने ३ तर आर अश्विनने १ विकेट घेतली. त्यानंतर भारतीय संघाचे सामन्यात पुनरागमन झाले. परंतु, तरीसुद्धा भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला. श्रीलंकेने ६ विकेट्सने भारतीय संघाचा पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाची फायनलमध्ये जाण्याची संधी हुकली.

या स्पर्धेत भारत आशिया चषक स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. मात्र, भारतीय संघाकडे फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी आहे. पाकिस्तानचे अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्याशी आणखी दोन सामने शिल्लक आहेत. यापैकी आज अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केले तर भारतीय संघाला फायनलमध्ये जाण्याची संधी मिळू शकते.

जर अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघाकडून पाकिस्तान हरला तर सुपर ४ मधील तीन संघांकडे प्रत्येकी एक विजय राहील. त्यांनतर धावगतीच्या (नेट रन रेट) आधारावर फायनलमध्ये पोहोचणारा संघ निवडण्यात येईल.

पाकिस्तानचा पराभव झाल्यास भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचू शकतो. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पाकिस्तानचा नेट रन रेट ०.१२६, अफगाणिस्तानचा – ०.५८९ तर भारताचा नेट रन रेट – ०.१२५ असा आहे.

महत्वाच्या बातम्या
Kolhapur: स्कूलबस चालवताना आला हार्टॲटॅक; बसचालकाने आधी विद्यार्थ्यांचा जीव वाचवला अन् मगच सोडले प्राण
Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकरांनी माफी मागीतली नाही तर त्यांना सडके मासे खाऊ घालू; कोळी महीला का संतापल्या? जाणून घ्या…
Navneet Rana : नवनीत राणांचा पोलिस स्टेशनमध्ये राडा, अधिकाऱ्यांवर बरसल्या, पोलिसांचेही जशास तसे प्रत्यूत्तर
‘या’ कारणामुळे २ महिन्यातच मुख्यमंत्री शिंदेंना वैतागले अधिकारी; वाचा नेमकं असं काय घडलं?

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now