Share

मविआ’ला धक्का! देशमुख, मलिकांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करता येणार नाही; कोर्टाचा आदेश

मुंबईतील(Mumbai) विशेष न्यायालयाने गुरूवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी एक दिवसाची परवानगी मिळावी, यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. (Deshmukh, Malik will not be able to vote in Rajya Sabha elections -Court)

हा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने फेब्रुवारीमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक तुरुंगात आहेत.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख देखील मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी तात्पुरता जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांच्याकडे गेल्या आठवड्यात अर्ज दाखल केले होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असे म्हणत ईडीने देशमुख आणि मलिक यांच्या याचिकेला विरोध केला होता.

अर्जदार हे विद्यमान आमदार असून, ते राज्यसभेच्या सदस्याच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यास पात्र आहेत, असे अनिल देशमुख यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले होते. तसेच नवाब मलिक यांच्या वकिलांनी सांगितले की, “नवाब मलिक हे निवडून आलेले आमदार आहेत. ज्यसभेवर प्रतिनिधी निवडताना ते त्यांच्या मतदारसंघातील रहिवाशांचे प्रतिनिधित्व करण्यास बांधील आहेत.”

बुधवारी या जामीन अर्जाच्या बाजूने आणि विरोधात सर्व पक्षकारांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय गुरुवारपर्यंत राखून ठेवला होता. पण आज विशेष न्यायालयाने निकाल देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. येत्या १० जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे.

विधानसभेत भाजपच्या सध्या १०६ जागा आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा २ जागांवर विजय निश्चित मानला जात आहे. यानंतरही भाजपकडे २२ मते अतिरिक्त आहेत. याशिवाय भाजप सात अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करत आहे. एवढे सगळे करूनही भाजपला विजयासाठी १३ अतिरिक्त मतांची गरज आहे. यासाठी भाजपला लहान राजकीय पक्ष आणि इतर उर्वरित अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या :-
१४ व्या वर्षी मला बेडरूममधून किडनॅप केलं आणि ९ महिने केला रेप, महिलेने सांगितली भयावह कहाणी
कंडक्टरने प्रवाशांनी भरलेली एसटी माळशेज घाटात थांबवली; अन् पुढे केले असे काही की सगळेच हादरले
वा रे पठ्या! उमरान मलिकने फेकला सगळ्यात वेगवान बॉल, शोएब अख्तरचा मोडला रेकॉर्ड

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now