हिजाब म्हणजेच मुस्लीम महिला केसांभोवती गुंडाळत असलेल्या रुमालाच्या मुद्द्यावरून सध्या कर्नाटकात एका महिला महाविद्यालयात वाद सुरू आहे. यामुळे कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील ‘भांडारकर’ महाविद्यालय सध्या चांगलेच चर्चेत आहे. भांडारकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थीनींना रोखलं गेल्याचं समोर आलं आहे. (Denied admission to college for wearing a hijab)
चिंतेची बाब म्हणजे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीच या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारला आहे. हा वाद 20 दिवसांपूर्वी सुरू आहे. अखेर आता या संबंधित मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर येत्या 8 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
आम्हाला हिजाब परिधान करून वर्गात बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थिनींनी याचिकेत केली आहे. ‘आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारला, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला त्याच्या धर्माचे तत्वे पाळण्याचा अधिकार, असल्याचे मुलींनी म्हंटले आहे.
दरम्यान, यावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याचाच धागा पकडत टीका केली आहे. ‘अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?’ असा संतप्त सवाल आव्हाड यांनी ट्विट करत सवाल केला आहे.
आव्हाड म्हणतात, ‘तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेवबल फाटकी जीन्स घालणाऱ्या मुली यांना चालत नाही. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरूनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?” असं आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, हा वाद 28 डिसेंबर 2021 पासून सुरू झालेला असुन त्या दिवसापासून आम्हाला महाविद्यालयात बसू देण्यात आले नाही. तसेच आम्हाला आमच्या पालकांना घेऊन येण्यास सांगितले होते. प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या पालकांना घेऊन आलो, मात्र कॉलेज प्रशासनाने साधी त्यांची भेट देखील घेतली नाही, दावा या विद्यार्थिनींनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईमधील वाहतूक कोंडीमुळे ३% घटस्फोट होतात, अमृता फडणवीस यांचा विचित्र दावा
काळीज फाटलं! जन्मदात्या आईवर आली बाळाला विकण्याची वेळ आली; घटना वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पानी
“वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले असून,कितीही दडवले तरी बोलण्यातून त्यांची चड्डी दिसतेच.”
मधूबालाच्या ९६ वर्षाच्या बहिणीला सुनेने काढले घराबाहेर; जेवणही दिले नाही, टॉर्चर केल्यामुळे झाली भयानक अवस्था